शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

‘निसर्गा’मुळे ताटातूट : अखेर त्या बिबट पिल्लाची बोरिवलीला रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 7:12 PM

मंगळवारी दुपारी पुन्हा येथील शेतात दुसरे पिल्लू शेतमजुरांना मिळून आले. हे पिल्लू वनविभागाचे कर्मचारी व इको-एको फाउण्डेशनच्या वन्यजीवप्रेमींनी पुर्नभेटीसाठी तसेच संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात एका कॅरेटमध्ये ठेवले...

ठळक मुद्देपिल्लाची पुर्नभेट घडविणे शक्य झाले नाहीमळ्यात सलग दोन दिवस बिबट्याची दोन पिल्ले

नाशिक : पाथर्डी-गौळाणे रस्त्यावरील कोंबडे मळ्यात जन्मलेल्या बिबट्याच्या बछड्यांपैकी एका बछड्याची पुर्नभेट घालून देण्यास वनविभागाला यश आले; मात्र मंगळवारी (दि.२) दुपारी पुन्हा याच शेतात सापडलेल्या दुसऱ्या बछड्याची मादीसोबत भेट घडवून आणण्यास ‘निसर्गा’ने अडथळा निर्माण केला. अखेर या बछड्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात गुरूवारी (दि.४) करण्यात आली.वालदेवीच्या काठालगत असलेल्या यशवंतनगरमधील कोंबळे मळ्यात सलग दोन दिवस बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली. सोमवारी सकाळी आढळलेल्या पहिल्या पिल्लाला त्याच रात्री मादी पुन्हा सोबत घेऊन गेली. मंगळवारी दुपारी पुन्हा येथील शेतात दुसरे पिल्लू शेतमजुरांना मिळून आले. हे पिल्लू वनविभागाचे कर्मचारी व इको-एको फाउण्डेशनच्या वन्यजीवप्रेमींनी पुर्नभेटीसाठी तसेच संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात एका कॅरेटमध्ये ठेवले; मात्र पावसाची रिपरिप मंगळवारी रात्रीपासूनच सुरू झाल्याने कदाचित या पिलाची आई त्याला घेण्यासाठी येऊ शकली नाही. बुधवारी दिवसभर ढगाळ हवामान आणि सुरू असलेल्या पावसामुळे या पिल्लाची पुर्नभेट घडविणे शक्य झाले नाही. त्यामुळे बछड्याची उपासमार होऊ नये म्हणून पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या आदेशान्वये गुरूवारी मादी पिलाला गांधी उद्यानात वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी पोहचविले.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवleopardबिबट्याforest departmentवनविभाग