शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

एड्सबाधितांच्या मदतीसाठी दिव्यांगांचा ‘सूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 1:40 AM

नाशिक : अपंगत्वाचे आयुष्य जगणारे तसेच काहींना कुष्ठरोगाचा डाग लागलेला असतानाही केवळ सामाजिक कर्तव्यभावनेतून सुमारे ७० दिव्यांग कलावंतांनी एड्सग्रस्तांच्या ...

ठळक मुद्देसामाजिक उपक्रम : विकास आमटे यांची प्रेरणा

नाशिक : अपंगत्वाचे आयुष्य जगणारे तसेच काहींना कुष्ठरोगाचा डाग लागलेला असतानाही केवळ सामाजिक कर्तव्यभावनेतून सुमारे ७० दिव्यांग कलावंतांनी एड्सग्रस्तांच्या प्रतिष्ठेसाठी मदतीचे ‘सूर’ छेडले आहेत. विशेष म्हणजे थोर समाजसुधारक बाबा आमटे यांच्या आनंदवनातील हे दिव्यांग कलावंत असून, त्यांना डॉ. विकास आमटे यांनी या कलावंतांचा हा संच उभा केला आहे. सध्या हे कलावंत महाराष्टÑात एड्सग्रस्त मुलांसाठी कलागुण सादर करीत आहेत.आनंदवनात अनेकविध कारणांमुळे दाखल झालेले अपंग तसेच कुष्ठरोगी आता इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. कुष्ठरोगमुक्त आणि अपंगदेखील समाजासाठी योगदान देऊ शकतात, या भावनेतून डॉ. विकास आमटे यांनी कुष्ठरोगी आणि अपंगांचा वाद्यवृंद स्थापन केला आहे. या वाद्यवृंदातील कलावंत स्वत:साठी याचना करीत नाही तर समाजातील दुर्लक्षित, वंचित आणि पीडितांसाठी कलागुण सादर करीत आहेत. कुष्ठरोगमुक्त आणि अपंग व्यक्तींनी सुरू केलेला हा पहिला वाद्यवृंद मानला जात आहे.सध्या हे दिव्यांगबांधव अनाथ एड्सबाधित मुले आणि विधवांसाठी समाजाकडे सुरांच्या माध्यमातून याचना करीत आहे. स्वत: दिव्यांग असतानाही आपल्यासाठी नव्हे तर ज्यांच्या समाजप्रतिष्ठेचा आणि समाजमान्यतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशा एड्सबाधितांसाठी वाद्य आणि सुरांची बरसात करीत आहेत. हे कलावंत सामान्य कलावंत नाहीत तर कुष्ठरोगमुक्त आणि अपंग आहेत. त्यांच्यावर बाबा आमटे यांचे संस्कार असून, स्वत: डॉ विकास आमटे यांनी या कलावंतांना एकत्र करून पहिला वाद्यवृंद तयार केला आहे. दिव्यांगांंनी वंचितांसाठी कार्य करावे हीच मोठी प्रेरणा आहे.- डॉ. जयंत वाघसामाजिक कार्यकर्ते, आनंदवन