दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड येथील अंध विद्यार्थिनी अपेक्षा शिरसाठ हिने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जन्मतः अंध असूनही प्रतिकूल परिस्थितीत अपेक्षा हिने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले. पंचायत समिती व जनता विद्यालय ओझरखेड यांच्या वतीने ओझरखेड येथील शाळेच्या सभागृहात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे विशेषज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक वैभव शिवले, जिल्हा परिषद ओझरखेड शाळेचे मुख्याध्यापक विश्वास पाटोळे, शिक्षिका पौर्णिमा दीक्षित, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक योगेश वडजे यांनी केले.यावेळी इयत्ता बारावी परीक्षेत यश मिळवणारी अंध विद्यार्थिनी अपेक्षा शिरसाठ, इयत्ता दहावी परीक्षेत यश प्राप्त करणारे कमलेश भगरे, पूजा जाधव हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्षीरसागर, वैभव शिवले, विश्वास पाटोळे, पोर्णिमा दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर दमाले, वनिता कदम, श्रीमती निंबाळकर यांनी परिश्रम घेतले.
दिव्यांग अपेक्षा शिरसाठ हिचे बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 10:26 PM
दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड येथील अंध विद्यार्थिनी अपेक्षा शिरसाठ हिने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ठळक मुद्देशाळेच्या सभागृहात सत्काराचे आयोजन