ओझर : येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे होते.
याप्रसंगी विद्यालयाच्या शिक्षिका मोहिनी तारू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात काही जगप्रसिद्ध दिव्यांग व्यक्तींची स्टीफन हॉकिंग थॉमस एडिसन अरुणिमा सिन्हा यांची उदाहरणे देऊन तसेच संयुक्त राष्ट्र संघातर्फे १९८३ ते १९९२ हे दशक अपंगांसाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना अपंगांच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास भाग पाडले. दशक अखेरीस ३ डिसेंबरची निवड झाली, व १९९२ मध्ये पहिला अपंग दिन साजरा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, पर्यवेक्षक शांताराम गायकवाड, शरद शेजवळ, रामनाथ रायते, रावसाहेब शेलार, रेखा देशमाने, शितल हांडोरे, प्रांजल आथरे, दीपाली गडाख, चंपावती जाधव, विजय शिंदे, विशाल कातकाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत गवळी यांनी तर आभार रूपाली जाधव यांनी मानले.