शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

वाघदेवतेच्या पूजेने सुरु होते आदिवासींची दिवाळी

By admin | Published: October 25, 2016 11:30 PM

वाघदेवतेच्या पूजेने सुरु होते आदिवासींची दिवाळी

कळवण : दिवाळी सण आदिवासी समाजात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आजही टिकून असून, कळवण या आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम तालुक्यातील कोकणा, भिल्ल, महादेव कोळी या जमातीचे समाजबांधव दिवाळीची सुरुवात वाघबारशीने (वसूबारस) करतात.  हिंदू धर्मात दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी म्हटली की गोडधोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी, फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजन असा हा आंदोत्सवाचा सण  आहे. परंतु हाच दिवाळीचा सण आदिवासी समाजात अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची रूढी-परंपरा अजूनही कायम आहे. कळवणसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील कोकणा, भिल्ल, महादेव कोळी या जमातीचे आदिवासी बांधव दिवाळीची सुरुवातच वाघबारशीने (वसूबारस) करतात. कळवण तालुक्यातील बोरदैवत, देवळीवणी, चिंचोरे या तीन गावांच्या शिवाराच्या सरहद्दीवर असलेल्या वाघदेवाच्या नावाने तर गेल्या कित्येक वर्षांपासून चक्क भव्य अशी यात्राच भरते.वसूबारसेच्या म्हणजे आदिवासींच्या वाघबारशीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी (बाळदी) नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगलात जातात. या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात. दुपारी या तिन्ही गावांतील भगत व ग्रामस्थ गावाच्या सीमेवर असलेल्या वाघदेवाजवळ जमा होतात. आदिवासी परंपरेनुसार प्रत्येक गावाच्या सीमेवर वाघदेवाच्या मूर्तीची दगडावर तथा चिऱ्यावर स्थापना केलेली आढळते.  याला वाघदेवाचा चिरा किंवा पाटली असे संबोधले जाते. या वाघदेवाच्या पाटलीवर, चिऱ्यावर चंद्र, सूर्य, नागदेव, वाघदेव, मोर आदि चित्रे कोरलेली असतात. (वार्ताहर)