वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावर्षी एकूण नऊ सदस्य निवडून आले असून, आरक्षण घोषित झाल्यानंतर या ठिकाणी सरपंच पदासाठी सर्वसाधारण पुरुष खुला प्रवर्ग या जागेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ज्ञानेश्वर रामदास शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, उपसरपंचपदी बाळू लोहरे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात या निवडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी योगेश पगार, विजय चौधरी, भाऊसाहेब शिंदे, कैलास शिंदे, विलास शिंदे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश शिंदे, खंडू शिंदे, किसन लोहरे, अशोक मुसळे, गणपत लोहरे, जयराम शिंदे, चंद्रभान शिंदे, किसन शिंदे, राजाराम परदेशी, विजय परदेशी, भगवान शिंदे, कारभारी शिंदे, आदी उपस्थित होते.
वंजारवाडी सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:26 AM