शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये : नरेंद्राचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:31 AM

देवाची श्रद्धेने भक्ती करावी, मात्र अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. अंगारे, धुपारे यांच्यावर विश्वास ठेवल्यास मनुष्य अंधश्रद्धेचा बळी ठरतो. भोंदूगिरीला बळी पडू नये. देवाला बकरे, कोंबडे यांचा प्रसाद लागत नाही. देव भक्तीचा भुकेला आहे. देवाला जात-पात नाही, असे प्रतिपादन रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.

पंचवटी : देवाची श्रद्धेने भक्ती करावी, मात्र अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. अंगारे, धुपारे यांच्यावर विश्वास ठेवल्यास मनुष्य अंधश्रद्धेचा बळी ठरतो. भोंदूगिरीला बळी पडू नये. देवाला बकरे, कोंबडे यांचा प्रसाद लागत नाही. देव भक्तीचा भुकेला आहे. देवाला जात-पात नाही, असे प्रतिपादन रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.आशेवाडी येथे जनम संस्थांच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे आयोजित समस्या मार्गदर्शन व प्रवचन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना महाराज पुढे म्हणाले की, जो संतांच्या वचनाप्रमाणे वागतो त्यास देवाची प्रचिती येते. जीवन जगण्यासाठी बुद्धीचा वापर करून मनुष्याने प्रपंच करावा. नीटनेटका प्रपंच कसा करायचा हे सद्गुरू सांगत असतात. जीवनात येणारे आनंदाचे, दु:खाचे प्रसंग, मनुष्याने कसे वागावे हेदेखील सद्गुरू सांगत असतात. संतांच्या संगतीत जो राहतो तो संतांप्रमाणेच वागतो त्यामुळे नेहमी सद्गुरूंच्या संगतीत रहावे. प्रत्येकाने गुरू करावा. यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी ३०८ भक्तांना साधक दीक्षा दिली. जीवनात महत्त्वाचे काम करण्यासाठी व्यक्तीला मनुष्य देह मिळाला आहे. प्रपंच, समाजाचे ॠण फेडणे, मोक्ष मिळवणे हे तीन कामे होत. प्रपंचात मुलाबाळांवर प्रेम करावे, रडत रडत प्रपंच करू नये, आनंदी जीवन जगावे, आनंद झाला की हुरळून जावू नये अन् दु:खात घाबरू नये, असे महाराज म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम