सिन्नर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद न करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वीज वितरण कंपनी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
कोरोना काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी असल्याचे सांगळे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संघटक बाळासाहेब गोळेसर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव, शहराध्यक्ष निखिल लहामगे. गणेश मुत्रक, एकनाथ दिघे, धनंजय बोडके, वैभव शिरसाठ, गोरख जाधव आदी उपस्थित होते. कोराेना काळातील संकटात सापडलेल्या शेतक-यांकडून अवाजवी आकारलेली वीज बिले सक्तीने वसूल केली जात आहेत. कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून शेतक-यांना अडचणीत आणण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. आघाडी सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. हे अन्यायकारक धोरण न थांबविल्यास वीज वितरण कंपनीला मनसे स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
===Photopath===
090221\09nsk_13_09022021_13.jpg
===Caption===
सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांना वीजप्रश्नी निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्यासह पदाधिकारी.