नाशिक : रम्य सायंकाळ, आल्हाददायक गारवा आणि सादर होणाºया एकाहून एक सरस मधुर हिंदी गजल गाण्यांची मेजवानी यामुळे रसिक भारावून गेले होते. निमित्त होते ‘गजल के साज उठाओ’ कार्यक्रमाचे. सोमवारी (दि.५) सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात ही मैफल रंगली. यावेळी गायक मीना परुळेकर, श्रेयसी राय, ज्ञानेश्वर कासार यांनी ‘दिल धडकने का सबब...’ ‘शोला या जल बुझाओ ...’, ‘दिखाई दिए यूॅँ’,‘मै खयाल हूॅँ’, ‘आज जाने की जिद ना करो’, ‘मेरे हमसफर’, ‘शलोना सा सजन है’, ‘कभी कहा ना किसीसे’, ‘फिर घिडी रात’,‘ यूॅँ हसरते को दागे’, ‘झुकी झुकी की नजर’, ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो’ आदि विविध गजल सादर केली. उत्तरोत्तर रंगलेल्या या मैफलीस श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुसुमाग्रज स्मारकाच्या वतीने मराठी दिनानिमित्त कुसुमाग्रज स्मरण अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. फैयाज अहमद फैजी यांनी निवेदन केले. यावेळी अनिल धुमाळ ,स्वरांजय धुमाळ , सतीश पेंडसे, बाबा सोनवणे यांनी साथसंगत केली. प्रारंभी गायक व वादक कलाकारांचे स्मारकाचे विश्वस्त विनायक रानडे, अॅड. विलास लोणारी यांनी पुष्प देऊन स्वागत केले. गजल प्रकाराचा इतिहास, या कलेची आजवरची वाटचाल या विषयी डॉ. फैयाज यांनी सविस्तर माहिती दिली.
आज जाने की जिद ना करो....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:21 AM