कळवण : सतत तीन ते चारवेळा शासनाचा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार घेणाऱ्या कळवण उपजिल्हा रु गालयात आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांची वानवा असल्याने उपजिल्हा रु ग्णालयात आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दाखल होणाऱ्या आदिवासी व सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. औषध साठा नसल्याचे कारण सांगता येत नसल्याने सर्दी, पडसे, डोकेदुखी असणाऱ्या रुग्णांनांही सरळ नाशिकचा मार्ग दाखवला जात असल्याचा कटू अनुभव कळवण तालुक्यातील जनतेला आता येऊ लागला आहे. कळवण उपजिल्हा रु ग्णालयात काही दिवसांपासून साधे सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला या आजारांवरील औषधांचा साठा शिल्लक नसल्याने रु ग्णांना गोळ्या, औषध बाहेरून घेऊन येण्याचा सल्ला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा देत असल्याचे चित्र आहे.. रु ग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा औषध साठा महिनाभरापासून शिल्लक नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या वृत्ताला एका कर्मचाऱ्याने दुजोरा दिला असून, औषध साठा उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हा रु ग्णालयातील यंत्रणेकडून वरिष्ठ यंत्रणेकडे पाठपुरावा केला जात नसून, केवळ मासिक बिले काढण्याचा सपाटा लावला जात आहे. उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक सेवेकडे यंत्रणेच्या असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कळवण उपजिल्हा रु ग्णालय आदिवासी जनतेला तत्पर आरोग्य सेवा देण्यास अपयशी ठरले असल्याचा आरोप कळवण तालुक्यातील आदिवासी जनता करू लागली आहे. खासदार आणि आमदार यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वसामान्य शासकीय सेवेपासून वंचित होत आर्थिक झळ सोसत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात बघावयास मिळत आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून तत्काळ औषधे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रोज सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला आदी विकारांमुळे आजारी रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्याने अनेकजण सलाईनवर असून त्यातच दवाखान्यात खोकल्याच्या औषधांचा तुटवडा असल्याने ग्रामीण भागातील गोरबरीब रु ग्णांना आर्थिक झळ बसून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. (वार्ताहर)
रु ग्णालयात औषधांची वानवा
By admin | Published: February 19, 2017 1:22 AM