नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या बहुतांशी नागरीक घरीच आहेत.आरोग्याची सजगता त्यातून जाणवत असली तरी घरी राहून कृतीतून आरोग्य सजगतादाखवली पाहीजे. त्यामुळे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि एकंदरचफिट राहाण्यासाठी योगासने करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सर्वांनी योगाकरण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या लॉक डाऊन योगाला केव्हाही सुरूवात करूनआपण फिट राहू शकतात.सध्याची नाजूक परिस्थिती आपणा सर्वांनाच माहीत आहे. या लॉकडाउनमुळे सर्वजण घरात बसून आहोत. घरातच आनंदी राहण्यासाठी कोणी खाण्याचे पदार्थ करूनपाहत आहे, तर कोणी गाण्याचा रियाज करीत आहेत तर कोणी नृत्याचा अभ्यासकरीत आहे. प्रत्येक जण आपापल्या आनंदी कसे राहायचे, काहीतरी करण्यातसर्जनशील कसे राहायचे या प्रयत्नात असतात. मात्र, दुसरीकडे अनेकांचेघराबाहेर पडणे, मोकळ्या हवेत फिरणे, जॉगींगला जाणे, ओपन जीमवर व्यायामकरणे बंद आहेत काही जण योगा क्लासेस लावतात तर काही जण जिममध्ये जातात.काही जण व्यायामासाठी सायकलींग करतात किंवा पांडवलेणे- चांभार लेण्यावरचढ उतार करतात. परंतु हे सध्या बंद आहे. व्यायाम बंद असल्याने अनेक जणआमचे घरी बसून नुसते वजन वाढत आहे, अशी तक्र ार करीत आहेत. या तक्र ारीततथ्य आहे परंतु बाहेर पडता येत नाही म्हणून काहीच करता येत नाही असे नाहीतर आपण घरी बसल्या बसल्या योगाभ्यास करू शकतो.योगासनांचे अनेक प्रकार आहेत. प्राणायाम, सूर्यनमस्कार हेनित्याचेच आहेत. परंतु खास मधुमेहींसाठी,संधिवातासाठी, गरोदर महिलांसाठी,दम्यासाठी, पाठीच्या मणक्याचे दुखणे यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. सध्याजण वर्क फ्रॉम होम करतात, त्यांच्यासाठी खुर्चीवर बसून देखील योगासनेकरता येतात. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील लवचिकता वेगळी असते. पण काहीकालावधी नंतर ही लवचीकता नक्कीच वाढते.सामान्यत: चाळीस मिनीटे योगासने आणि प्राणायाम हा पंधरा ते वीस मिनिटेकरणे गरजेचे आहे. असे करताना गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी,त्यांनी कपालभाती प्राणायाम टाळावा. अनुलोम विलोम प्राणायाम यांच्यासाठीयोग्य आहे. आत्ता उन्हाळ्यात शक्य झाले तर डाव्या नासिकेने श्वास घेणेआणि उजव्या नासिकेने सोडणे. असे किमान दहा वेळा तीन सेट केले तर जास्तफायदेशीर आहे. योगाभ्यासामुळे आपल्या शरीरावर तसेच मनावर फारच सकारात्मकपरिणाम होत असतो. ध्यान धारणे मुळे आणि प्राणायाम करण्यामुळे आपलीरोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते.आपण योगासने शिकण्यासाठी क्लासला नाही जाऊ शकत, पण आजकाल आॅनलाइनचाजमाना आला असून, असे अनेक यु-ट्युब चॅनल आहेत. याचा फायदा घेऊन आपण हावेळ आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी वापरु शकतो. अर्थात, असे करताना एकदमएका दिवसात अनेक योगासने करणे घातकारक ठरू शकतो. तेव्हा हळू हळू योगा करतआपला योगाभ्यास वाढवावा.तेव्हा मस्त रहा, आनंदी रहा, घरात रहा आण ि खुशाल रहा !- अर्चना दीक्षीत, योग शिक्षक
फिट राहाण्यासाठी घरी बसूनच करा योगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:10 PM
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या बहुतांशी नागरीक घरीच आहेत. आरोग्याची सजगता त्यातून जाणवत असली तरी घरी राहून कृतीतून आरोग्य सजगता दाखवली पाहीजे. त्यामुळे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि एकंदरच फिट राहाण्यासाठी योगासने करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सर्वांनी योगा करण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या लॉक डाऊन योगाला केव्हाही सुरूवात करून आपण फिट राहू शकतात.
ठळक मुद्देप्रतिकार शक्ती वाढतेधान्य धरणा करावीचाळीस मिनीटे करा योगा