शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

..तर तुमचाही दाभोलकर करू; भुजबळांना धमकीचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 1:49 AM

राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांना रविवारी दुपारी धमकीचे निनावी पत्र प्राप्त झाले असून, ‘मनुस्मृती आणि भिडे गुरुजींच्या विरोधात विधान केल्यास तुमचाही दाभोलकर, पानसरे केला जाईल’ असा धमकीचा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे़ दरम्यान, या धमकीच्या पत्रामुळे भुजबळ फार्मवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़

नाशिक : राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांना रविवारी दुपारी धमकीचे निनावी पत्र प्राप्त झाले असून, ‘मनुस्मृती आणि भिडे गुरुजींच्या विरोधात विधान केल्यास तुमचाही दाभोलकर, पानसरे केला जाईल’ असा धमकीचा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे़ दरम्यान, या धमकीच्या पत्रामुळे भुजबळ फार्मवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़ गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणांतून मनुस्मृतीला असलेला विरोध अधोरेखित करताना भारतीय संविधान श्रेष्ठ असल्याची विधाने केली आहेत. हाच मुद्दा निनावी पत्रात नोंदविण्यात आला आहे.  संभाजी भिडे आणि मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचाही दाभोळकर, पानसरे होऊ शकतो अशी धमकी देण्यात आली आहे. ‘मनुस्मृती जाळण्याने सर्व काही संपेल अथवा सर्वश्रेष्ठ मनुस्मृती नष्ट होईल तर तो मोठा गैरसमज आहे, अशा आशयाचे शिवराळ व एकेरी भाषेतील तीन पानी पत्र भुजबळ यांना पाठविण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करतांना शासनाने व गृह विभागाने देखील दखल घेण्याची मागणी केली आहे़या धमकी पत्रामध्ये भुजबळ यांचा विरोध करतांना मनुस्मृती आणि संभाजी भिडे यांचे कौतुक करण्यात आले आहे. ‘या पृथ्वीतलावर सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ती मनुस्मृती आहे, मनुस्मृती जाळल्याने सर्व काही संपेल अथवा सर्वश्रेष्ठ मनुस्मृती नष्ट होईल असे वाटत असेल तर तो मोठा गैरसमज आहे’ असा मजकूर लिहिण्यात आला आहेच शिवाय भिडे गुरुजी आणि त्यांचे धारकरी यांची ताकद माहिती नसेल, येत्या काळात तुमचाही दाभोळकर-पानसरे करण्यास वेळ लागणार नाही अशी धमकी देण्यात आलेली आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनाही पाहून घेऊ असा देखील उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.या धमकी पत्रानंतर विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी आमदार जयवंत जाधव यांच्यासह समर्थकांनी रविवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना निवदेन दिले़ भुजबळ यांनी मनुस्मृतीचे केलेले दहन व मनुस्मृतीचे समर्थन करणाºया भिडे यांच्याविरोधात घटनेच्या चौकटीत राहून टीका करीत असल्याने मनुस्मृती समर्थकांचे पित्त खवळले आहे़ भुजबळ हे राज्यासह देशभरात सभांसाठी जात असून, त्यांच्या स्वागतासाठी समुदाय जमत असल्याने त्याच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो़ शासनाने व गृह विभागाने गंभीर दखल घेण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे़यावेळी माजी आमदार जयवंत जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कोंडाजीमामा आव्हाड, विष्णूपंत म्हैसधुणे, अंबादास खैरे, वैभव देवरे, संजय खैरनार, धनंजय निकाळे, अनिता भामरे, किशोरी खैरनार, आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते़या पत्रावर पुण्याचा शिक्काआमदार छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्मच्या पत्त्यावर एका पाकिटात हे पत्र आलेले असून, त्यावर पुणे पोस्टाचा शिक्का आहे़ पुण्याहून पाठविण्यात आलेले हे पत्र शनिवारी भुजबळ फार्मवरील टपाल पेटीत पडलेले होते, आज सकाळी हे पत्र उघडण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ दरम्यान, धमकीचे पत्र हे तीन पानी असून, ते संगणकावर टाइप करून त्याची मोठ्या अक्षरात प्रिंट काढलेली आहे़धमकीचे पत्र आलेले असून, सुमारे ८० कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे़ यानुसार भुजबळ यांच्या संरक्षणाची मागणी केली आहे़ या निवेदनाची पोलिसांनी दखल घेतली असून, आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून यंत्रणेस तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे़ तसेच विधी विभागासही माहिती देण्यात आली आहे़  - लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, नाशिकधमक्यांना घाबरत नाहीआपणाला अशा अनेक धमक्या आलेल्या असून असल्या निनावी पत्रांना मी कोणतीही किंमत देत नाही, अशा धमक्यांना मी घाबरत नाही़ अशा प्रकारच्या धमक्या येतच असतात, यास मी फारशी किंमत देत नाही़ मनुस्मृतीला विरोध केला म्हणून जिवे मारण्याचा उल्लेख पत्रामध्ये आहे़ आपले काम पुढे सुरूच राहाणार आहे.  - छगन भुजबळ, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस