शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

दलितवस्ती, बंधारे पैसे खाण्यासाठी आहेत काय?

By admin | Published: December 24, 2015 12:07 AM

आढावा बैठक : आयुक्तांनी अधिकाऱ्यांना खडसावले

नाशिक : बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्यांची कामे टिकतात आणि दलितवस्ती सुधार योजनेतून केलेल्या रस्त्यांमधून धूळ उडते. इतकेच नव्हे तर छोटे-छोटे बंधारे बांधण्यामागचा उद्देश काय? केवळ पैसे खाण्यासाठीच हे उद्योग केले जातात काय? यापुढे असे चालणार नाही, या शब्दात बुधवारी (दि. २३) विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंते व उपअभियंत्यांना खडसावले.बुधवारी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायत विभागांतर्गत कार्यरत असलेले संग्राम कक्षातील कर्मचारी संपावर असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाल्यामुळे आयुक्त एकनाथ डवले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ठणकावत सांगितले की, कोणावरही विसंबून न राहता या कर्मचाऱ्यांना पर्यायी यंत्रणा तयार करण्यासाठी आपण वारंवार सांगितले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण का दिले नाही,अशी विचारणा केली. येवला तालुक्यातील सर्वच योजना व विकासकामांबाबत प्रचंड तक्रारी असल्याने त्यांनी येवला गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे कळते. तसेच लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंता व उपअभियंत्याची कान उघडणी करीत जलयुक्तची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, केवळ छोटे-छोटे बंधारे करून पैसे खाण्याचे धंदे बंद करा, या शब्दात कान उघडणी केल्याचे समजते. दलितवस्तीचे रस्ते का निकृष्ट होतात, बाकी विभागांचे रस्ते चांगले आणि दलितवस्तीचे रस्ते धुळीने भरलेले, हेसुद्धा बंद झाले पाहिजे,अशी तंबी त्यांनी यावेळी दिल्याचे कळते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, रणधीर सोमवंशी, प्रतिभा संगमनेरे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, आर. एस. परदेशी आदिंसह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)