जिल्ह्यातील एकूण शेतकरी - ८,४४,५६५
गेल्या वर्षी किती शेतकऱ्यांनी काढला पीक विमा - २७२०००
यावर्षी किती शेतकऱ्यांनी काढला पीक विमा - १३२०००
एकूण खरीप क्षेत्र - ६६५५८२.२०
पीक क्षेत्र
भात ५७७९६.९०
बाजरी ७२२६२.४०
मका २२८००२
तूर ७२३८.७०
भुईमूग २३३९५.२०
सोयाबीन ८८६९१
कापूस ३४३११.००
चौकट-
यंदा केवळ १६ टक्के पीक विमा !
जिल्ह्यात एकूण साडेआठ लाखांच्या जवळपास खातेदार शेतकरी संख्या असून, यावर्षी केवळ १५ ते १६ टक्के शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला आहे. याला वेगवेगळी कारण असली तरी विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळेही अनेक शेतकरी पीक विम्याकडे पाठ फिरवत असतात. त्यामुळेच यावर्षी गतवर्षीपेक्षाही कमी संख्या झाली आहे.
चौकट-
गतवर्षीचा अनुभव वाईट
कोट-
मागच्या वर्षी उसनवारी करून पीक विम्याचे पैसे भरले; पण आमची मका पावसात सापडून नुकसान झाले तेव्हा कंपनीने नियमांवर बोट ठेवत नुकसान भरपाई नाकारली यामुळे यावर्षी पीक विमा घेतलाच नाही. पोटाला चिमटा देऊन विमा कंपन्यांची भरती करण्यापेक्षा त्या वाटेला न गेलेलेच बरे. - अशोक दौंडे, शेतकरी
कोट-
पीक विमा काढताना विमा कंपन्या मोठमोठी आश्वासने देते प्रत्यक्षात नुकसान भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा शेतकऱ्यांना नियम दाखवते. नुकसान झाल्यानंतर वेळेत कंपनीला कळविणे शक्य झाले नाही तरी भरपाई मिळत नसल्याचा अनुभव आहे. यावर्षी हप्त्याची रक्कमही वाढली असल्याने विमा घेतला नाही. - निवृत्ती रसाळ, शेतकरी
कोट-
गतवर्षी जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. ५९ हजार शेतकऱ्यांना सुमारे ३४ कोटींची नुकसान भरपाई मिळाली होती. यावर्षी लांबलेल्या पेरण्या आणि इतरही कारणांमुळे पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कर्जदार शेतकरी असले तरी पीक विमा घेणे ऐच्छिक आहे. कृषी विभागामार्फत दरवर्षी त्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक, नाशिक