शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

झुंडशाहीमुळे डॉक्टर्स भयभीत : विक्रम गोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:40 AM

डॉक्टर हा रुग्णाला जीवदान देण्यासाठी तयार झालेला असतो. रुग्णाचा मृत्यू व्हावा, यासाठी तो कधीही तयार नसतो. अखेरच्या क्षणापर्यंत सेवाव्रती डॉक्टर आपले कौशल्य पणाला लावून रुग्ण दगावू नये, यासाठी झटत असतो; मात्र समाजातील अपप्रवृत्तीचे लोक हे समजून घेणारे नाही.

नाशिक : डॉक्टर हा रुग्णाला जीवदान देण्यासाठी तयार झालेला असतो. रुग्णाचा मृत्यू व्हावा, यासाठी तो कधीही तयार नसतो. अखेरच्या क्षणापर्यंत सेवाव्रती डॉक्टर आपले कौशल्य पणाला लावून रुग्ण दगावू नये, यासाठी झटत असतो; मात्र समाजातील अपप्रवृत्तीचे लोक हे समजून घेणारे नाही. त्यामुळे झुंडशाही फोफावत असून, या देशातील सेवाव्रती डॉक्टर भयभीत झाला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित गंगापूररोडवरील श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीने आयोजित ‘संकल्पातून सिद्धीकडे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात गोखले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रविवारी (दि.२३) रावसाहेब थोरात सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल भालेराव, गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष विनायक गोविलकर, डॉ. अनंत पंढरे, प्रवीण बुरकुले उपस्थित होते. यावेळी गोखले यांनी गुरुजी रुग्णालयात सेवाव्रती म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला करून देणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त लेखिका वंदना अत्रे यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक गोविलकर यांनी केले व सूत्रसंचालन सोनाली तेलंग यांनी केले.या देशात ५५ वर्षांत बहुतांश राजकारण्यांनी लोकांना फुकट मागण्याची सवय लावली. ज्या लायकीचे लोक असतात त्यांना त्याच लायकीचे सरकार मिळते, असेही गोखले म्हणाले. आंबेडकरांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाचे विचारही अंगीकारावे, असे गोखले म्हणाले.

टॅग्स :doctorडॉक्टरVikram Gokhaleविक्रम गोखले