सटाणा : सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम सेवा देऊन खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व कोरोना योद्धे असल्याचे गौरवोद्गार नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी काढले. सुनील मोरे मित्रमंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शहरातील डॉक्टरच्या कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना म्हटले की, कोरोना काळातील आठ महिने स्वतःच्या आरोग्याची काळजी सोबतच संपूर्ण बागलाण तालुका व सटाणा शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी अतिशय जबाबदारी पूर्वक सांभाळल्याबद्दल तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य असून, ते आम्ही पार पाडत असल्याचे सांगितले. यापुढेही असेच तालुक्यातील व शहरातील सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूतीने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, आयमाचे अध्यक्ष डॉ. किरण अहिरे, डॉ. प्रकाश जगताप, डॉ. दिग्विजय शहा, डॉ. रामलाल बंब, सचिव अमोल पवार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉक्टरांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. किरण पवार, डॉ. सचिन पवार, डॉ. शरद पवार, डॉ. स्वप्नील पवार, डॉ. पंकज शिवदे, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. अमित सूर्यवंशी, डॉ. रवींद्र सूर्यवंशी, डॉ. वैभव सूर्यवंशी, डॉ. यतिन सूर्यवंशी, डॉ. संदीप ठाकरे, डॉ. विठ्ठल येवलेकर, राहुल सोनवणे, डॉ. राकेश खैरनार, डॉ. पवनराज गांगुर्डे, डॉ. नितीन पाटील आदी उपिस्थत होते.
सटाण्यात आयुर्वेद दिनी डॉक्टरांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 9:22 PM