सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे गावालगत असणाºया बंधाºयामध्ये हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय तरु णाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२४) घडली.ओम राज वैष्णव (१४) हल्ली मुक्काम दोडी बुद्रुक ता. सिन्नर असे मयत मुलाचे नाव आहे. वैष्णव कुटुंब काही दिवसांपूर्वी नाशिक येथून दोडी येथे राहण्यास आले होते. ओमचे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने तो आई-बहिणीसह गावात राहत होता.सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तो मित्रांसमवेत बंधाºयात हात पाय धुण्यासाठी केला असता अचानक पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन बंधाºयातील पाण्यात शोधाशोध केली. तब्बल अर्धा तासानंतर ओमला पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले.त्याला तातडीने दोडी ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी पी. आर. ठाकरे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती वावी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून हवालदार प्रवीण अढांगळे हे पुढील तपास करीत आहेत.
दोडी येथील मुलाचा बंधाऱ्यात बुडुन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 9:08 PM
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे गावालगत असणाºया बंधाºयामध्ये हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय तरु णाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२४) घडली.
ठळक मुद्देतब्बल अर्धा तासानंतर ओमला पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले.