शहरात १८ नोव्हेंबर १९८९ साली पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. भद्रकाली आणि इंदिरानगर व अंबड या तीन पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने मुंबईनाका पोलीस ठाणे अस्तित्वात आणले गेले. या पोलीस ठाण्याच्या अस्तित्वामुळे अन्य तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीचे भौगोलिक क्षेत्र कमी होऊन अतिरिक्त ताण कमी झाला. पोलीस ठाणे अस्तित्वात येऊन बरीच वर्षे लोटली ; मात्र अद्याप स्वतंत्र इमारतीत पोलीस ठाणे स्थलांतरित होऊ न शकल्यामुळे सर्वच गैरसोय होत आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर म्हणून मुंबईनाका ओळखला जातो. स्वतंत्र जागा नसल्यामुळे पार्किंगची जागाच उपलब्ध नसल्याने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वाहनांपासून तर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांनासुध्दा जागाच नसल्याने रस्त्यावर वाहने उभी करावी लागत असल्याने वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होताना दिसून येतो.
---इन्फो---
गंगापूर पोलीस ठाण्याची अवस्था बिकट
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उच्चभ्रू परिसरासह काही झोपडपट्ट्यांचाही समावेश आहे. या पोलीस ठाण्यालाही स्वतंत्र जागा व इमारतीची आवश्यकता आहे. मागील अनेक वर्षांपासून हे पोलीस ठाणे हक्काच्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहे. सुसज्ज, अद्ययावत इमारत नसल्याने पार्किंगसह अन्य सर्वच सोयी-सुविधांचे तीनतेरा झाल्याचे दिसून येते. वाहनतळ नसल्याने कॉलनी रस्त्यावरच पोलीस ठाण्याबाहेर वाहने उभी करावी लागतात.
---इन्फो--.
...या पोलीस ठाण्यांचे बांधकाम जीर्ण
शहरातील भद्रकाली (१९७२), देवळाली कॅम्प (१९८०), अंबड (१९९१) हे तीन पोलीस ठाणे सर्वाधिक जुने पोलीस ठाणे म्हणून ओळखले जातात. या पोलीस ठाण्यांच्या वास्तुंचे बांधकामदेखील जीर्ण झाले आहेत. पोलीस ठाण्यांच्या बांधकामाला अनुक्रमे ४७, ३९ व २८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे या पोलीस ठाण्यांच्या नूतनीकरणाची वेळ आता समीप आली आहे.
----इन्फो---
उपनगरला वाढीव निधीची प्रतीक्षा
उपनगर पोलीस ठाण्याकरिता २ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून वाढीव अडीच कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा कायम आहे. सध्या परक्या इमारतीत पोलीस ठाणे अस्तित्वात असून वाढीव निधी उपलब्ध झाल्यास हक्काच्या जागेत व इमारतीत स्थलांतरित होण्याचा मार्ग खुला होणार आहे. त्याचप्रमाणे सातपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामाकरिता साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून डीपीडीसीकडे याकरिता मागणी करण्यात आली आहे.
----
पॉइंटर्स
शहरातील पोलीस ठाणे
१४
पोलीस
३०२०
---
पोलिसांची शासकीय वाहने
दुचाकी - ६१
चारचाकी - ४७
----
फोटो- ०७पोलीस/०७पोलीस स्टेशन नावाने फोटो आर वर सेव्ह.
जेपीजी ०७पोलीस ठाणे पार्किंग नावाने फॉरमेट आर वर
===Photopath===
070321\07nsk_9_07032021_13.jpg
===Caption===
पोलीस ठाणे व पोलीस आयकॉन