कळवण : महाराष्ट्रातही कोरोना रु ग्ण आढळत असल्यामुळे या व्हायरसची लागण आपल्याला होऊ नये म्हणून नागरिक मेडिकल दुकानांमध्ये जाऊन मास्कबरोबरच सॅनिटायझरची मागणी करत असले तरी मेडिकलमधूनच मास्कपाठोपाठ सॅनिटायझरही गायब झाले आहेत. अचानक सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे ग्रामीण भागातील मेडिकल शॉप्समध्ये सध्या सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे चित्र असून, कुणी सॅनिटायझर देतं का सॅनिटायझर...! असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.ग्रामीण व आदिवासी भागात सॅनिटायझर व मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल, विनाकारण पैसे खर्च करू नयेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रत्येक दोन ते तीन तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. गिरीश देवरे यांनी केले आहे. यापूर्वी सॅनिटायझरची तुरळक विक्री होत होती. परंतु कोरोनाविषयी जनजागृती होत स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन होत असल्याने नागरिकांनी मेडिकलमध्ये धाव घेत सॅनिटायझर; तसेच मास्कची मागणी केली आहे. गेल्या दोन दिवसांत सॅनिटायझरची मागणी वाढली असली तरी मेडिकल विक्रेत्यांकडे साठाच शिल्लक नसल्याची बाब समोर आली आहे. या विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नियमित हात धुणे, नाक, तोंड झाकून ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदी मुख्य सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत. ग्रामीण भागात यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची विक्र ी होत नव्हती मात्र आता कोरोनाचा धसका घेतलेल्या नागरिकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून खबरदारी घेत सॅनिटायझर वापरण्याचा चंग बांधला असला तरी सॅनिटायझर मिळणे मात्र मुश्कील झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. या आधी सॅनिटायझरची विक्र ी कमी प्रमाणात होती. सध्या मागणी वाढल्याने कंपनीकडे मागणी केली आहे; परंतु कंपनीकडे माल शिल्लक नसल्याचे सांगण्यात आल्याने तुटवडा जाणवतो आहे.- नितीन वालखडे, संचालक,संजीवनी मेडिकल, कळवणआपण सॅनिटायझर घेण्यासाठी बऱ्याच मेडिकल मध्ये गेलो. परंतु सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. स्वच्छतेसाठी सॅनिटायझर महत्त्वाचे असल्याने उत्पादक कंपन्यांनी केवळ शहरी भागच केंद्रित न करता ग्रामीण व आदिवासी भागातही ते उपलब्ध करून द्यावेत.- देवा शिंदे, ग्राहकग्रामीण व आदिवासी भागात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा आहे. नागरिकांनी साधा रु माल बांधला तरी चालेल. साबणाने दोन-तिनदा स्वच्छ हात धुतल्यास कोरोनाचा धोका टाळता येईल. उपजिल्हा रुग्णालयात बेडचा विलगीकरण कक्ष स्थापन केला असून, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.- डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रु ग्णालय, कळवण
कुणी सॅनिटायझर देतं का सॅनिटायझर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 8:29 PM
कळवण : महाराष्ट्रातही कोरोना रु ग्ण आढळत असल्यामुळे या व्हायरसची लागण आपल्याला होऊ नये म्हणून नागरिक मेडिकल दुकानांमध्ये जाऊन ...
ठळक मुद्देकोरोनामुळे मागणी : ग्रामीण भागात सॅनिटायझरचा तुटवडा