अवकाळी पाऊस तसेच गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे. नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला भाव मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कुठेतरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळून दुग्ध जनावरांचे पालन करीत आहेत. परंतु दोन वर्षांपासून कोरोनामुळे दुधालाही चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे दुग्धव्यवसाय आधीच धोक्यात आलेला असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच अधिक भर म्हणून पिसाळलेल्या कुत्र्याने भरवस फाट्याजवळील ठुबे वस्तीवरील गाई, वासरे, म्हशीचे पारडू, शेळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अकरा शेतकऱ्यांच्या जनावरांना चावा घेतला.
चावा घेतलेल्या जनावरांना डॉ. भाऊराव सांगळे, डॉ. गाजरे, डॉ. सय्यद, डॉ. वाघ आदी डॉक्टरांनी लसीकरण करून उपचार केले. परंतु त्यातील रंगनाथ मुदगुल यांची गाय दोन दिवसांपासून तोंडावाटे लाळ गाळत असून पिसाळल्यासारखे करीत असल्याने इतर शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून जनावरांची झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
इन्फो...
यांच्या जनावरांना घेतला चावा...
नारायण ठुबे एक गाय, बारकु ठुबे एक गाय, पोपट जाधव एक गाय, बाळासाहेब मुदगुल एक गाय, संपत मुदगुल एक गाय व एक शेळी, रंगनाथ मुदगुल एक गाय, खंडू मुदगुल एक गाय व एक म्हैस, उत्तम जाधव एक गाय, अण्णा दरेकर एक गाय, सुनील मुदगुल एक गाय, संजय मुदगुल दोन गायी.
छायाचित्र - ०६ विंचूर १
भरवस फाट्याजवळील ठुबे वस्तीवरील पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने रंगनाथ मुदगुल यांची पिसाळलेली गाय.
060921\06nsk_14_06092021_13.jpg
भरवस फाट्याजवळील ठुबे वस्तीवरील पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने रंगनाथ मुदगुल यांची पिसाळलेली गाय.