लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणतेच प्रयत्न केले जात नसल्याचे लक्षात येताच नागरिकांकडून दाराशी लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवण्याची अनोखी शक्कल लढविली जात आहे. कुत्र्यांचा जाच कमी व्हावा व घरात बरकत नांदावी यासाठी लोकांनी हा शॉर्टकट शोधला असला तरी ही अज्ञानातून पसरवेली अंधश्रद्धा असून, यात कोणतेही तत्थ्य नसल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन व बुवाबाजी विरोधी संघटनेने म्हटले आहे.सध्या नामपूर शहरातच नव्हे, तर महाराष्ट्रातील बऱ्याचशा गावात घरापुढे लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्याचे आढळून येते. ग्रामीण भागातच नव्हे; तर शहरी भागातही बºयाचशा घरांपुढे लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या घराच्या चौफेर ठेवलेल्या दिसतात. या बाटल्यांमध्ये कुंकू मिश्रित पाणी टाकून या बाटल्यांची मांडणी प्रवेशव्द्वारा-जवळ किंवा घराच्या कुंपणाजवळ केली जाते. या बाटल्या का ठेवतात याची बरीचशी वेगवेगळी कारणे ऐकायला येतात.घरापुढे, अंगणात कुत्री, डुकरे व मांजरी घाण करतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो. कुत्री व डुकरे या रंगाला घाबरतात किंवा समोर मानवी प्रतिकृती उभी असावी असे या प्राण्यांना वाटते. तसेच काही महिलांच्या मते कुंकूमिश्रित पाणी हे मांगल्याचे प्रतीक मानतात. यामुळे घरातले वातावरण मंगलमय राहते व व्यवसायात बरकता येते, अशी भावना आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही चिकित्सा न करता लोक अज्ञानातून व अंधश्रद्धेतून अनुकरण करीत असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.कुंकूमिश्रित पाण्याच्या बाटल्या आज शहरांबरोबर ग्रामीण भागातही बºयाच घरांपुढे ठेवलेल्या दिसतात. यामुळे घरात बरकत राहते हा अंधश्रद्धेचा भाग बाजूला ठेवला तर भटके प्राणी लाल रंगाजवळ जात नसावेत अशा दृष्टिकोनातून त्यात कदाचित तथ्य असावे.- सचिन अहिरराव,नागरिक, नामपूरघरापुढे लाल बाटल्या ठेवणे ही अज्ञानातून आलेली व कर्णोपकर्णी पसरवलेली अंधश्रद्धा आहे. कुत्र्यांना रंगज्ञान नसते. त्या पाण्यात रसायन असेल म्हणून कुत्रे लांब जातील असेही नाही. तसेच यामुळे बरकत कशी राहील, त्यासाठी कष्ट करावे लागते.आम्ही प्रात्यक्षिक करून पाहिले, त्यात तत्थ्य नाही.- महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह, बुवाबाजी विरोधी संघटना
कुत्र्यांना आता लाल बाटल्यांचाधाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:23 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नामपूर : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणतेच प्रयत्न केले जात नसल्याचे लक्षात येताच नागरिकांकडून ...
ठळक मुद्देअंधश्रद्धा : ग्रामीण भागातील प्रकारावर अंनिसची प्रतिक्रिया