लोकमत न्यूज नेटवर्कजानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील शेरी रस्त्याला राहणाऱ्या एका शेतकºयाचा श्वानबिबट्याने फस्त केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु काल रात्री शेरी रस्त्याला राहाणारे शेतकरी चुनीलाल तिडके यांचा श्वान पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने शेतातून फस्त केला. त्यामुळे शेतकºयांमध्ये अजूनच भीतीचे वातावरण तयार झाले आहे. चार-पाच दिवसांपूर्वी आखरपाठ वस्तीजवळील ग्रामस्थांना एक बिबट्या व त्याचे दोन छावे रात्रीच्या वेळेस फिरताना दिसले होते. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला पकडून जंगलात सोडून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
बिबट्याकडून जानोरीत श्वान फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:39 PM
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील शेरी रस्त्याला राहणाऱ्या एका शेतकºयाचा श्वान बिबट्याने फस्त केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ठळक मुद्देशेतकºयांमध्ये अजूनच भीतीचे वातावरण