अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. पगार होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. राजेंद्र कापडे, प्रा. एस. एम. पगार व क्रीडा संचालक प्रा. हेमा मांडे उपस्थित होते.
प्रास्ताविक व कोर्सची रूपरेषा क्रीडा संचालक प्रा. हेमा मांडे यांनी मांडली.
उद्घाटनप्रसंगी योग शिक्षक जगन्नाथ महाजन यांनी सांगितले की, नियमित योगा केल्याने मनावर व कार्यक्षमतेवर त्याचा चांगला परिणाम होतो. योगाने मन एकाग्र करणे गरजेचे असून, जेव्हा एखादे कार्य मनापासून करतो तेव्हा माणूस यशस्वी होतो. ‘आपले शरीर आपली जबाबदारी’ ही संकल्पना अंगिकृत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. बी. एस. पगार यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ऋतुजा पाटील हिने केले. प्रा. एस. एम. पगार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. यु. के. पवार, प्रा. श्रीमती इंगळे, प्रा. कदम, प्रा. वृषाली पगार व बेसिक योग प्रमाणपत्र कोर्सचे विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो - २४ कळवण कॉलेज
कळवण महाविद्यालयात बेसिक योग प्रमाणपत्र कोर्सच्या उदघाटनप्रसंगी योगशिक्षक जगन्नाथ महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एस. पगार, प्रा. राजेंद्र कापडे, प्रा. एस. एम. पगार व क्रीडा संचालक प्रा. हेमा मांडे उपस्थित होते.