गेल्या महिन्यापासून फुलेनगर परिसरात अनेक शेतकऱ्यांना दिवसा व रात्रीच्यावेळी बिबट्या दिसला होता. अनेक पाळीव कुत्र्यांना बिबट्याने भक्ष्य केले होते. अनेक शेतकऱ्यांना शेतात पाणी भरतांना बिबट्या दिसून आल्याने शेतकरी धास्तावले होते.
शेतकऱ्यांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी वनविभागाने सुरेश त्र्यंबक भगत यांच्या शेतात पिंजरा लावला होता. शुक्रवारी (दि.५) पहाटे या पिंजऱ्यात मादी बिबट अडकली. पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या डरकाळ्यांनीच शेतकरी जागे झाले. पोलीस पाटील भगत यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती सिन्नरच्या वनविभागाला मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, ए बी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी प्रीतेश सोनवणे, वनरक्षक के. आर. इरकर, मधुकर शिंदे, ए. जे. पवार, वनसेवक नारायण वैद्य यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी फुलेनगर येथे धाव घेऊन पिंजऱ्यातील बिबट्याला ताब्यात घेऊन त्याची रवानागी वनविभागाच्या हद्दीत केली.
फोटो- ०५ फुलेनगर बिबट्या
सिन्नर तालुक्यातील फुलेनगर(माळवाडी) येथे पिंजऱ्यात जेरबंद झालेली मादी बिबट.
===Photopath===
050321\05nsk_10_05032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०५ फुलेनगर बिबट्या सिन्नर तालुक्यातील फुलेनगर(माळवाडी) येथे पिंजऱ्यात जेरबंद झालेली मादी बिबट.