ठळक मुद्दे शाळा बंद, पण शिक्षण चालू
नांदूरवैद्य : लॉकडाऊनमध्ये शाळा बंद, पण शिक्षण चालू आहे. इगतपुरी तालुक्यातील जामुंडे शाळेतील १०६ विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शिक्षणात अनंत अडचणी येत होत्या. मात्र ही समस्या मुख्याध्यापक अनिल शिरसाठ यांच्या प्रयत्नातून डोनेट डिव्हाइस उपक्रम राबून दूर करण्यात आली. सेवानिवृत्त अभियंता सुहास पाटील, सुनंदा पाटील, निशांत पाटील, विलास पाटील, सतीश जगताप, अमित रोहमारे, ए.आर. पाटील, डी. सी. शर्मा, आर.जे. शिरोडे, गिरीश कंकरेज, विनोद साळुंखे यांनी अॅण्ड्रॉइड मोबाइल जमवून जामुंडे शाळेतील विद्यार्थ्यांना दिले. भाऊसाहेब मते तसेच इगतपुरी बिटाचे विस्ताराधिकारी अशोक मुंढे, नांदगाव सदो केंद्राचे तंत्रस्नेही केंद्रप्रमुख श्रीराम आहेर आदी उपस्थित होते.