चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले.खेरवाडी शिवारातील त्र्यंबक संगमनेरे (गट क्र. ४२८) यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी (दि.२७)पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास कोल्हा पडला होता. याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी यांना दिली.त्या नंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व सकाळी १०.३० वाजता बचाव कार्य सुरू करण्यात आले.विहिरीमध्ये कोल्हा एका कपारीमध्ये बसला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी एक मोठ्या दोराला खाट बांधून ती खाट विहिरीत सोडण्यात आली. काही वेळानंतर सदर कोल्हा त्या खाटावर बसूताच त्याला सुखरुप बाहेर काढून मुक्त करण्यात आले.वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल जी. बी. वाघ, वनरक्षक विजय टेकणार, वनसेवक भैया शेख व वनमजूर यांनी या करीता परीश्रम घेतले.
खेरवाडी येथे कोल्ह्याला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 3:05 PM
चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले.
ठळक मुद्देवनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल