नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाचा वैभवशाली इतिहास राहिला आहे. या पोलीस दलाचा मला नेहमीच गर्व वाटतो. राज्याच्या सुरक्षेसाठी सदैव कटीबध्द असणाऱ्या पोलीस दलाचे तुम्ही उपनिरिक्षक दर्जाचे अधिकारी म्हणून आज शपथ घेतली, त्यामुळे तुमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल, यात शंका नाही. सरकार म्हणून मी नेहमी पोलीस दलाच्या पाठीशी आहे. आपले सेवाव्रत निष्ठेने जोपासताना चारित्र्यासह कमविलेल्या वर्दीवर कुठलाही कलंक लागणार नाही, याची सर्वोतोपरी खबरदारी घ्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिकच्या संस्थेत सरळसेवेची परिक्षा उत्तीर्ण करून प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांच्या क्रमांक ११७च्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात सोमवारी (दि.३०) येथील कवायत मैदानावर पार पडला. यावेळी ६८८ प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांनी सशस्त्र संचलन करत ठाकरे गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयसवाल यांना मानवंदना दिली. ठाकरे यांच्या हस्ते अष्टपैलू कामगिरी करत प्रशिक्षण कालावधीत विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणारे सोलापूर जिल्ह्यातील संतोष अर्जुन कामटे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’) म्हणून गौरविण्यात आले. उपनिरिक्षक विजया पवार यांना सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी ठाकरे पुढे म्हणाले, राज्यापुढे सुरक्षेची विविध आव्हाने उभी ठाकली आहेत; मात्र राज्याचे पोलीस दल त्या आव्हानांशी दोन हात करण्यासाठी सक्षम आहे. या दलाचे तुम्ही घटक असून भविष्यात निष्ठेने आपले कर्तव्य बजवावे, असे ठाकर यावेळी म्हणाले. दरम्यान, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे यांनी अहवाल वाचन केले....आता यापुढे ‘रिव्हॉलव्हर ऑफ ऑनर’काळानुरूप सुरक्षेची आव्हाने बदलली असून पोलीस दलानेही आधुनिकतेची कास धरली आहे. तलवारीचा इतिहास शौर्य गाजविणारा नक्कीच आहे; मात्र काळानुरूप शस्त्र बदलावीच लागतात. त्यामुळे आता यापुढे ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ म्हणून मानाची तलवार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीला प्रदान करण्याऐवजी मानाची रिव्हॉलव्हर प्रदान केली जावी, अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण्याच्या अखेरीस केली.‘आपलं सरकार’ पोलिस दलाच्या पाठीशीआपलं सरकार पोलीस दलाच्या पाठीशी आहे. वर्षभराचे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही उपनिरिक्षक म्हणून स्वत:ला या प्रबोधिनीत घडविले. राज्यभरातील पोलीसांना घडविणाºया येथील प्रबोधिनीचा अवघ्या देशाला नव्हे तर जगाला हेवा वाटेल, अशा सर्व भौतिक व आधुनिक सोयीसुविधा प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून उपलब्ध करून देण्यासाठी मी वैयक्तिक लक्ष देईल, असे वचन ठाकरे यांनी दिले.