ओझर : सदगुरूंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. सदगुरुंच्या नामात प्रचंड सामर्थ्य आहे ते ओळखा आणि ओम जनार्दनाय नमः या महामंत्राचा सतत जप करा आणि आपले जीवन सार्थक करा. मौनव्रत असल्याने असे लेखी प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा साजरा होत असतो. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे आश्रमात जास्त गर्दी न करता काही मोजक्याच साधकांच्या उपस्थितीत पुण्यस्मरण सोहळा होत आहे. याप्रसंगी कोरोना महामारी संपुष्टात येण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली जात आहे. रोज पहाटे ५ वाजता ब्रम्हमुहूर्तावर नित्यनियम विधी, प्राणायाम, ध्यान, भागवत वाचन, महाआरती, सत्संग संपन्न होत आहे.देशभरातील भविकांना ऑनलाईन पद्धतीने सोहळ्याचा लाभ घेता येत आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महायज्ञ, जपानुष्ठान, अखंड नंदादीप, नामसंकीर्तन यांसह विविध आध्यात्मिक साधना कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी सुरू आहे. यावेळी स्वामीजींचे मौनव्रत असल्याने लेखी संदेश त्यांनी दिला.
सदगुरुंच्या नामाचा विसर पडू देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:51 IST
ओझर : सदगुरूंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. सदगुरुंच्या नामात प्रचंड सामर्थ्य आहे ते ओळखा आणि ओम जनार्दनाय ...
सदगुरुंच्या नामाचा विसर पडू देऊ नका
ठळक मुद्देशांतिगिरी महाराज : जनार्दन स्वामी महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा