शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Eknath Shinde : शेतकऱ्यांनो चिंता करू नका...! या पावसात जेवढं नुकसान होईल ते सगळं आम्ही भरून देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 6:03 PM

मुंख्यमंत्री शिंदे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ आणि स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते...

नाशिक- गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ठीक-ठिकाणी  अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातच आता "शेतकऱ्यांनो चिंता करू नका! या पावसात जेवढे नुकसान होईल ते सर्व आम्ही भरून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. एवढेच नाही तर, शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्ट कऱ्यांचं आहे आणि मुंडे साहेबांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ते सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ आणि स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, आजही गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारी जनता आपल्या घरातील शुभ कार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेऊन ठेवतात. ही एक श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि हा एक विश्वास आहे. या राज्यात अनेक लोकनेते आपण पाहिले. ज्यांनी चांगले काम केले ते लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले, मात्र गोपीनाथ मुंडे हे लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते.

मुंडेसाहेब या युतीचे शिल्पकार होते -गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यां माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष केला. आता तर गाड्या घोड्या सर्व आलं, पण सत्तरच्या दशकात त्यांनी सायकलवरून शबनमची झोली गळ्यात अडकवून, सायकलवरून प्रसंगी पायी प्रवास करून त्यांनी या राज्यात काना कोपऱ्यात भारतीय जनता पक्ष वाढविण्याचे काम केले. मुंडे आणि प्रमोद महाजन जी, हे खऱ्या अर्थाने या देशाची आणि राज्याची जी गरज होती, शिवसेना भाजप युतीची, मुंडेसाहेब या युतीचे शिल्पकार होते. बाळासाहेबांवरही त्यांचे प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती आणि बाळासाहेबांनाही त्यांच्याबद्दल मोठं प्रेम होते. विश्वास होता. याचे साक्षिदार आम्ही आहोत, असे शिंदे म्हणाले. 

आपल्या राजकीय कारकिर्दीत मुंडे साहेबांनी अनेक चढउतारही पाहिले. त्यांच्या जीवनात चांगले दिवसही आहे. पण काही संघर्षाचा काळही आला. ज्या ज्या वेळी संघर्षाचा आणि अडचणींचा काळ येत होता, त्या त्यावेळी बाळासाहेब, मुंडे साहेबांना मार्गदर्शनाचे दोन शब्द सांगत होते, असे शिंदे म्हणाले. 

...हे आपण मुंडेंकडून शिकण्यासारखं -एक असे मोठा नेते जे देशालाही नेतृत्व देऊ शकले असते, असे नेते अकाली जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. ते गेले तो काळा दिवस होता. त्यांनी समाजासाठी जे काम केले, त्यामुळे त्यांच्या शेवटच्या दिवशी जिकडे तिकडे माणसे वणव्यासारखी धावत होते. त्यांची अभ्यासू वृत्ती, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं वक्तृत्व आपण मुंडेंकडून शिकण्यासारखं आहे. ते सभागृहात बोलायला लागले, की सभागृहात सन्नाटा व्हायचा, असेही शिंदे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेNashikनाशिकBJPभाजपाShiv Senaशिवसेना