ठळक मुद्देमाझे कुटुंब, माझी जबाबदारी योजनेंतर्गत ही तपासणी सुरू
चांदोरी : येथील आशा सेविकांमार्फत संपूर्ण गावातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपालिकेच्या वतीने चांदोरी गावात माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजनेंतर्गत ही तपासणी सुरू आहे.निफाड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चांदोरी हे हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे ग्रामपालिका प्रशासनाने संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी लसीकरणाबाबतही जागृती केली जात आहे. या सर्वेक्षणासाठी चांदोरी येथील स्नेहल भोज, अनुजा गडाख, मीना पतंगराव, रत्ना गाडेकर, सुषमा वाटरे, सांगीता वारघडे, अनिता बागुल, सुनीता बागुल, मनीषा कुमावत आदी आशा सेविका काम करीत आहेत.