थेट पक्ष कार्यालयांतून...नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि राष्टÑवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यात सरळ लढत असल्याचे मानले जात असल्याने या दोघांच्याही कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष लागून होते. विविध वाहिन्यांवरील एक्झिटपोलने गोडसे यांना विजयचा कौल दिला असल्यामुळे शिवसेना कार्यालयामध्ये सकाळपासून कार्यकर्ते जमले होते. दुसरीकडे राष्टवादी कार्यालयात मात्र कुणीही फिरकले नाही. सायंकाळपर्यंतही कार्यालयाला कुलूप लागल्याचे दिसून आले.सकाळच्या सुमारास शहरातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्टवादीच्या कार्यालयात एकत्र आले होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर कार्यकर्ते अंबड येथील मतमोजणी केंद्रात रवाना झाले, त्यानंतर मात्र राष्टवादीच्या कार्यालयात कुणीही फिरकले नसल्याचे दिसून आले. सुरक्षिततेच्या कारणास्तव या कार्यालयाच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र नेहमीच गजबजलेल्या या कार्यालयात दिवसभर शुकशुकाट होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास राष्टवादीच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली असता या कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला लॅच लावण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांना विचारणा केली असता कार्यालयात कार्यकर्ते फिरकले नसल्याचे त्यांनी सांगितले.कार्यालयाबाहेर नेहमीच असणारा गाड्यांचा ताफा आज कुठेही दिसला नाही. निकालानंतरच्या विजयासाठीची कोणतीही तयारी करण्यात आली नसल्याचेदेखील दिसून आले. राष्टवादीच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. काहींनी नंतर बोलण्याचे सांगून अधिक बोलण्याचे टाळले.राष्टवादी पक्षाच्या विविध आघाड्या शहरात कार्यरत आहेत. मात्र या आघाड्यांपैकीदेखील कुणाकडूनही निकाल जाणून घेण्याचा उत्साह दिसून आला नाही. त्यामुळेच राष्टवादीच्या विविध आघाड्या, राष्टवादीचे स्थानिक पदाधिकारी यांच्या वैयक्तिक कार्यालयांमध्ये देखील अभावानेच कार्यकर्ते दिसून आले.कॉँग्रेस कार्यालयातही निरूत्साहराष्टÑवादीचा मित्रपक्ष असलेल्या कॉँग्रेसच्या कार्यालयातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. महात्मा गांधी रोडवरील पक्ष कार्यालयात नेहमीप्रमाणेच शांतता पसरली होती. कार्यालय सकाळपासून उघडण्यातदेखील आले नसल्याचे दिसून आले. पदाधिकारीदेखील कार्यालयाकडे फिरकले नाहीत. अर्थात कॉँग्रेसचा उमेदवार नसल्यामुळे कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या तयारीची अपेक्षादेखील नव्हती.
राष्टवादीच्या कार्यालयाची दारेच बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:56 AM