नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील तयारी वेगाने सुरू असून, लॉकडाऊन हटल्यास किंवा निर्बंध शिथिल झाल्यास ही सेवा दोन महिन्यांनी सहज सुरू होऊ शकणार आहे.महापालिकेने बससेवा ताब्यात घेण्याचा निर्णय २०१८ मध्येच घेतला. त्यानुसार ही सेवा सुरू करण्याची कार्यवाही सुरू होती.काही अपूर्ण सेवा, मात्र अडचणी नाही !महापालिकेच्या बसडेपोचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. ते पूर्ण होणे शक्य नसले तरी तात्पुरते शेड उभारून कामे करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. पिकअप शेडचा विषय प्रलंबित असून, त्याला मात्र विलंब लागण्याची शक्यता आहे.४दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या जागा आणि बसस्थानके शेअरिंग करण्याबाबत करार प्रलंबित असले तरी ते नंतरही केले जाऊ शकतात. मात्र, सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.याशिवाय बससेवेसाठी वाहक पुरविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. सुमारे ७०० कर्मचारी खासगी पुरवठादारामार्फत घेण्यात येणार असून, त्यासाठी दिल्ली येथील संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनीदेखील लवकरच कर्मचारी पुरवठा करणार आहे
सप्टेंबर महिन्यात मनपाच्या बससेवेला ‘डबल बेल’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 12:20 AM
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील तयारी वेगाने सुरू असून, लॉकडाऊन हटल्यास किंवा निर्बंध शिथिल झाल्यास ही सेवा दोन महिन्यांनी सहज सुरू होऊ शकणार आहे.
ठळक मुद्देतयारी पूर्णत्वाकडे : इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम्सचे काम सुरू, दिल्लीची कंपनी पुरवणार वाहक; शहरात दोनशे सीएनजी बसेस धावणार