शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

नोटाबंदीचा दुहेरी फटका

By admin | Published: January 03, 2017 10:54 PM

द्याने परिसरातील शेतकरी हवालदिल

द्याने : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे द्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, ५० दिवसांनंतरही व्यापाऱ्यांकडे चलन तुटवडा असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.  शेतकऱ्यांनी मका व कांदा विक्र ी केल्यानंतर तब्बल १५ दिवसात धनादेश मिळत असून, धनादेश जमा होण्यास अजून १५ दिवस शेतकऱ्यांना वाट पहावी लागत आहे. मजुरांना मजुरी देण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे पूर्वी चालत असलेली ‘पडजी’ पद्धतीने व्यवहार सुरू असल्याचे चित्र मोसम परिसरात पाहावयास मिळत आहे. नामपूर आठवडे बाजारात भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली असून भाजीपाला तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे.  केंद्रसरकारने 8 नोव्हेंबरपासून एक हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या.हा निर्णय चांगला असला तरी 50 दिवस उलटूनही सरकार नवीन चलन उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरल्याने व्यवहारात चलनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे शेतीचे अनेक व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.बाजारात शेतीमाल विक्र ीनंतर तब्बल एक मिहना पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कांदा गहू,हरभरा ही पिके जोमात आहेत त्यांच्याकरिता खतांची मात्रा,बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरु आहे.शेतीची कामे वाढल्यामुळे शेतमजुरांची गरज भेडसावत आहे.मात्र आवश्यक पैसे मिळणे दुरापास्त झाले आहे.बँकांमध्ये शेतकरी, पेन्शनर, महिला, अपंग, वृद्ध यांना रांगेत उभे राहून मिळताय कमी पैसे मिळत असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरीवर्गाची मोठ्या प्रमाणावर खाती असून, पुरेसा चलन पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर थांबावे लागते.नोटबंदीमुळे बँकातून रक्कम काढण्यावर घातलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना पैसे काढण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागत असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिवसभर उभे राहून दोनच हजार हातात मिळत असून, त्यामुळे पैसे काढण्यासाठी वारंवार जावे लागत असल्याने शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना बँकेत रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.शेतकऱ्यांना मालविक्र ीनंतर पैसे रोख मिळत नसल्यामुळे सध्या कांदा, मका, हरभरा, गहू आदि पिकांना खते, बियाणे, औषधे, मजुरांचे पैसे देणे असो की दैनंदिन गरजांसाठी पुरेसा पैसा बँकांकडून मिळत नसल्याने सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असून, द्यानेसह मोसम परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू आहे. शेतीची मशागत, खते, लागवडीसाठी मजुरांना देण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कांदा मातीमोल भावाने विकावा लागत असल्याने व विकलेल्या मालाचे धनादेश मिळत असल्याने दुहेरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर)