लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे विभागातून अध्यक्षपदासाठी जगविख्यात खगोल संशोधक आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव आला होता. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत प्रथमच एका शास्त्रज्ञाला आणि विज्ञानकथा लेखकाला स्थान मिळाले. त्यानंतर झालेल्या विविध घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पहिल्या विज्ञान कथालेखक आणि संशोधकाला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळू शकला आहे.
डॉ. नारळीकर यांनी विज्ञानाच्या मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची कामगिरी बजावून विज्ञानप्रसाराच्या क्षेत्रातही मराठी भाषेतून जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल, असे कार्य केले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या जागतिक दर्जाच्या कामगिरीमुळे तसेच त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना १९६५ साली पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानविषयक, खगोलशास्त्रविषयक पुस्तकांची संख्यादेखील खूप मोठी आहे. मात्र, साहित्य संमेलनाच्या इतिहासातील गत ९४ वर्षांत कोणत्याही विज्ञान कथालेखकाला कधीही अध्यक्षपदाचा मान मिळालेला नाही. त्यामुळे एका संशोधक विज्ञान लेखकाला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळणे ही संमेलनाच्या इतिहासात गत ९३ वर्षांत न झालेली ऐतिहासिक घटना ठरणार आहे. नारळीकर यांच्यासारख्या तत्त्वनिष्ठ संशोधक व्यक्तीला साहित्य संमेलनातील अघळपघळपणा रुचणारा नाही. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांनादेखील अत्यंत नीटनेटकेपणा आणि वक्तशीरपणाबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे.
इन्फो
विज्ञान संशोधनासाठी देशाचे सर्वोच्च पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी त्यांना भारत सरकारने यापूर्वीच गौरविलेले आहे. त्यांनी विज्ञानकथालेखक म्हणून एकाहून एक ज्ञानवर्धक आणि रंजक भाषांतील पुस्तकांचे लेखन केले असून त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा आणि अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कारानेदेखील त्यांना गौरविण्यात आले आहे.
फोटो
...तर इतिहास घडेल या २३ जानेवारीच्या तिसऱ्या पुरवणीत ‘सी’ पानावर छापलेल्या बातमीचा पीडीएफ वापरावा.