--------------------------------------------
बँकिंग सेवा प्रशिक्षण
सिन्नर : सीवायडीए आणि युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सिन्नर येथे वित्तीय समावेशक बँकिंग सेवा तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. यामध्ये सोनिया गारचा यांनी बँकिंग क्षेत्रातील सुविधा, सुरक्षितता, डिजिटल व्यवसायाचे फायदे तोटे, सायबर क्राइम, सोशल मीडियाचा अतिरेक, व्हॉटसअॅप आणि फेसबुक यांच्या माध्यमातून होणारी नागरिकांची फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले.
------------------------------
बच्छाव, चिकणकरवर कारवाई करा
सिन्नर : धार्मिक भावना भडकवणाऱ्या नामदेव बच्छाव व गजाननबुवा चिकणकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय भागवत धर्म परिषदच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष नारायण महाराज वाघ, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर हांडे, युवा उपाध्यक्ष हनुमान बैरागी, संपर्क प्रमुख हरिभाऊ गवळी, सरचिटणीस प्रथमेश कर्पे, संघटक सदाशिव रेवगडे, राजेंद्र रेवगडे, वामन गाडे, रवी काकड, किरण यादव, अनंत उगले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------------------------
सिन्नरला ५३ वटवृक्षांचे वाटप
सिन्नर : सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३व्या वाढदिवसानिमित्त ५३ वटवृक्षाच्या रोपांचे वाटप तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आले. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुटे आदींचा तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.