गंगापूर : गोदावरी नदीला आलेल्या महापुरात गिरणारे रोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुरवस्था झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. शेडच्या जमिनीवरील बैठक व्यवस्था व खाली जमिनीला मोठं मोठे भगदाड पडले असून, एखाद्या नागरिकाचा पाय अडकून दुर्घटना घडू शकते, शासनाचे यावरी कोट्यवधी रु पये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले. या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.गिरणारे दुगाव तसेचपंचक्रोशितील नागरिक याठिकाणी दशक्रियाविधीसाठी येत असतात त्यांना विधिवत कार्यक्रमासाठी चांगली जागा म्हणून गोदावरी नदीवरील पुलाखाली शासनाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या निधीमधून दशक्रि याविधी शेडची निर्मिती केली जाते, मात्र शासनाच्या गुणनियंत्रण विभाग मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची खात्री न करता त्याचे प्रमाणपत्र सढळ हाताने दिले जात असल्याचे या दशक्रियाविधीची अवस्था बघून वाटते. स्थानिक नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे हे शेड जेव्हा बांधण्यात आले, त्याच्या दोन-तीन महिन्याने शेडचे वरचे पत्रे उडून गेले, त्यानंतर ते पत्रे संबंधित ठेकेदाराने बसविल्यानंतर काही महिन्यांनी शेडच्या पायाखालची वाळू सरकून जमिनीत सिमेंट काँक्रीट असतानाही मोठे भगदाड पडले. आता तर गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे या शेडची तर अजूनच दुरवस्था झाली आहे. याठिकाणी परिसरातील गावातील नागरिक विधी पार पडतात. मात्र अशा अवस्थेत विधी कशी पार पडली जाईल याची शंका वाटते. परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त केला आहे. या सर्व कारणांना संबंधित ठेकेदार, संबंधित अधिकारी तशेच काम पूर्णत्वाचा दाखला देणारे सर्व अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, असे संतप्त नागरिकांनी सांगितले.गोदावरी नदीवरील पुलाखाली शासनाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या निधीमधून दशक्रि याविधी शेडची निर्मिती केली जाते, मात्र शासनाच्या गुणनियंत्रण विभाग मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची खात्री न करता त्याचे प्रमाणपत्र सढळ हाताने दिले जात असल्याचे या दशक्रियाविधीची अवस्था बघून वाटते. स्थानिक नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे हे शेड जेव्हा बांधण्यात आले, त्याच्या दोन-तीन महिन्यांतच शेडचे वरचे पत्रे उडून गेले, त्यानंतर काही महिन्यांनी शेडच्या पायाची वाळू सरकून जमिनीत सिमेंट काँक्रीट असतानाही मोठे भगदाड पडले.
गिरणारे रोडवरील दशक्रि याविधी शेडची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 1:08 AM