शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

शौचालय योजनेचा ड्रेनेजवर ताण

By admin | Published: December 24, 2015 12:23 AM

स्वच्छ भारत : पंचवटीत सर्वाधिक शौचालयांचे काम

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत नाशिक महापालिकेने उघड्यावर शौचविधीस बसणाऱ्या नागरिकांसाठी शौचालय बांधून देण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली असली तरी झोपडपट्टी भागात त्याची सर्वाधिक संख्या असल्याने ड्रेनेज लाइनवर ताण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, भविष्यात ड्रेनेज लाइन तुंबून मलनिस्सारण व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पंचवटी विभागात सर्वाधिक लाभार्थी असून सहाही विभागातील सुमारे ४१८७ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारमार्फत स्वच्छ भारत (नागरी) अभियानअंतर्गत घरोघरी शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार, महापालिकेने पाच महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण केले असता, ५१ हजार ५८४ कुटुंबांच्या घरात शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले, तर ४४ हजार ६८० कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याचे समोर आले होते. ७१७४ कुटुंबे मात्र उघड्यावरच शौचविधी पार पाडत असल्याचे आढळून आले. त्यानुसार, महापालिकेने सदर ७१५४ कुटुंबांकडून शौचालय उभारणीसंबंधी अर्ज भरून घेतले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर त्यातील ८७७ अर्ज तांत्रिक मुद्द्यांवरून बाद ठरविण्यात आले. ६०७३ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधून दिले जाणार असून त्यांना त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान अदा केले जाणार आहे, तर ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्याकरिता २२४ ठिकाणी सामूहिक शौचालय उभारले जाणार आहेत. महापालिकेने त्यासाठी खासगी एजन्सीचीही मदत उपलब्ध करून दिली असून शौचालय उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, झोपडपट्टी भागात सर्वाधिक लाभार्थी असून तेथील ड्रेनेज लाईनला सदर शौचालयांचे आउटलेट जोडण्यात आल्याने ड्रेनेजलाइनवर ताण पडून मलनिस्सारण व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सदर योजनेची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती बनली आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत पंचवटी विभागात सर्वाधिक १४८४ लाभार्थी निश्चित करण्यात आल्याने पुन्हा एकदा महापौर, उपमहापौरांच्या भागातच योजना वळविल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला आहे. सिडकोत ६६४, नाशिकरोडला १३४१, नाशिक पश्चिम विभागात २६७, सातपूर विभागात २४३ तर पूर्व विभागात २१८ लाभार्थी निश्चित करण्यात येऊन आतापर्यंत ७३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)