संजय पाठक ।नाशिक : नाटकांना नेहमी रंगभूमी चळवळ संबोधले जाते आणि नाटकाचा प्रयोग असतो. याचा विचार केला तर ही चळवळ व्यावसायिक नाही हे लक्षात येते. नाशिकमध्ये मुंबईतील संस्थांची नाटके येतात कारण रसिक प्रेक्षक तसे आहेत, परंतु एकमेव सुसज्ज नाट्यमंदिराची इतकी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ असेल तर नाटचळवळ संपेल आणि प्रेक्षकही दुरावतील अशी भीती नाट्य अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केली आहे.नाट्यगृह सुसज्ज चांगलेच आहेत त्याच्या भरपाईसाठी दरवाढ करावी लागत असेल तर मग व्यावसायिक परिषदा आणि तत्सम कार्यक्रमांसाठी करावी आणि नाटकांसाठी मात्र दर कमी ठेवून व्यावायिक कार्यक्रमांच्या दरातून त्याची भरपाई करावी, अशी सूचनाही जाधव यांनी केली आहे.महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेबाबत मी आणि माझ्यासारख्या कलावंतांनीच आवाज उठवला होता. त्यामुळे कलामंदिरात सुधारणा झाली हे खूपच चांगले झाले. परंतु अवस्था वाईट असतानाही मुंबईच्या संस्था नाशिकमध्ये नाटकं लावत होत्या आणि आता नाट्यगृह चांगले झाले तर नाटके लावता येणार नाही अशी अवस्था होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाटकाच्या बाबतीत नेहमीच ती एक चळवळ असल्याचे मानले जाते. नाटकांचे प्रयोग लावले जातात, असा शब्द प्रयोग केला जातो. त्यातून नाट्य चळवळीचे वेगळे स्वरूप लक्षात येते. सध्या वेगवेगळ्या विषयांची हाताळणी करणारी नाटके येत आहेत. अशी नाटके नाशिकमध्ये व्हावीत अशीमुंबईच्या संस्थांची इच्छा असते. कारण नाशिकला नाटकाचे चांगले वातावरण आहे आणि प्रेक्षकही आहेत. कालिदासची अवस्था चांगली नसतानाही तेनाटकांना येतात. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात भाडेवाढ झाली तर नाशिकला नाटक करणे कठीण होईल, असेही ते म्हणाले. नाट्यरसिकांची एक पिढी संपत असताना तरुण रसिक प्रेक्षक तयार झाले पाहिजेत, त्यासाठीच नाट्यसंस्था वेगवेगळ्या विषयांची आणि प्रयोगांची हाताळणी करीत आहेत. परंतु नाटके झाली नाही तर नाट्यगृहांचा प्रेक्षक घडणार नाही. अर्थात, शासन किंवा महापालिका असे होऊ देणार नाही नाटकाचे दर कमी करतील, असा विश्वास आहे.
नाट्यचळवळ संपेल, प्रेक्षकही दुरावतील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 1:04 AM
नाशिक : नाटकांना नेहमी रंगभूमी चळवळ संबोधले जाते आणि नाटकाचा प्रयोग असतो. याचा विचार केला तर ही चळवळ व्यावसायिक नाही हे लक्षात येते. नाशिकमध्ये मुंबईतील संस्थांची नाटके येतात कारण रसिक प्रेक्षक तसे आहेत, परंतु एकमेव सुसज्ज नाट्यमंदिराची इतकी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ असेल तर नाटचळवळ संपेल आणि प्रेक्षकही दुरावतील अशी भीती नाट्य अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देभरत जाधव : व्यावसायिक कार्यक्रमांमधून दराची भरपाई करावी