शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 6:21 PM

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.संपूर्ण सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. त्यावेळी कोकाटे बोलत होते. व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते डी. पी. आव्हाड, गंगाधर वरंदळ, पद्माकर गुजराथी, बंडूनाना भाबड, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, शहराध्यक्ष पंकज जाधव, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, नगरसेवक नामदेव लोंढे, भाजपाचे पंचायत समितीतील गटनेते विजय गडाख, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, सुधीर रावले, मल्लू पाबळे, अरुण वाघ, शीतल कानडी, रामभाऊ लोणारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सिन्नर बसस्थानकापासून मोर्चास प्रारंभ झाला. दुष्काळ जाहीर करावा, वीजबिल व कर्जमाफी, पीकांचे पंचनामे करावे, चारा छावण्या सुरु कराव्यात आदिंसह विविध फलक घेऊन शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यात आला. तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी लता गायकवाड, पोलीस निरीक्षक मुंकुंद देशमुख यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्विकारले.तालुक्यात नियोजन नसल्याने पाणीयोजना कोलमडल्या आहेत. जनावरांना चारा व पिण्याचे पाणी नाही. लोकप्रतिनिधी समन्वय समितीचे अध्यक्ष असतांना दुष्काळी आढावा बैठक नसल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांनी केला. आता लक्ष वेधले तरच शासन आपल्या दारी येईल. मोर्चा शासनाच्या किंवा आमदारांच्या विरोधात नसून लक्ष वेधण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. विद्यमान आमदार व मी दोघेही सत्तेत आहे. मी भाजपात असून मोर्चा काढायला घाबरत नाही, तुम्ही का घाबरता असा सवाल आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव न घेता उपस्थितीत करुन कोकाटे यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून एकत्र येण्याचे आवाहन केले.सत्तेत असो किंवा नसो दुष्काळ सर्वांना सारखाच आहे. मात्र मोर्चाबाबत वेगळा विचार का केला जात आहे असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. आपण सत्तेत असतांना व आमदार असतांना तालुक्यात जनावरांसाठी छावण्या सुुरु होत्या. शेतकºयांना घरपोहच चारा केला. टॅँकर सुरु करतांना कधी अडचण आली नाही. आता मात्र नियोजन नसल्याने व तालुक्याच्या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने शेतकºयांवर अशी परिस्थिती ओढावल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. आता सुरु असलेल्या विविध योजना केवळ पैसे खाण्यासाठी असून जिल्हा परिषद अध्यक्ष व स्थानिक आमदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. केवळ पत्रव्यवहार करुन प्रश्ने सुटत नाही, त्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यासह बैठका घ्याव्या लागतात. मात्र विद्यमान आमदारांचा अधिकाºयांवर वचक नसल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.स्थानिक आमदारांना दुष्काळाचे गांभीर्य नसल्याने व एकही टंचाई आढावा बैठक न झाल्याने लक्ष वेधण्यासाठी सदर मोर्चा काढावा लागल्याचे कोकाटे म्हणाले. भविष्यात दुष्काळाचे संकट गडद असून त्यासाठी सरकारची गरज भासणार आहे. त्यासाठी मदत मिळावे यासाठी लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे कोकाटे म्हणाले. 

टॅग्स :Farmerशेतकरी