नामपूर : बागलाण तालुक्यातील काकडगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी अजित पंडितराव अहिरे यांच्या शेतात बिबट्याने दर्शन दिल्याने घबराट पसरली आहे. दरोरोज रात्री परिसरातीत लहान मोठया प्राण्यावर बिबटयाच्या हल्ला केल्याच्या घटना घडत असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील अनेक नागरिकांना दररोज नर व मादी अशा दोन बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे . अजित अहिरे यांचा सुमारे सात एकर उस लागवड केला असून द्वारकाधीश कारखान्याकडे सदर उस तोडणीची मागणी करूनसुद्धा संबधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे उस उत्पादक संतप्त झाले आहेत. काकडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात दुभत्या गाई , बैल ,शेळ्या, मेंढ्या व पोल्ट्री फार्म आहेत.वन खात्याने या भागात तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी सरपंच निंबा सोनवणे , अजित अहिरे यांनी वन खात्याकडे केली आहे .
काकडगाव परिसरात बिबट्याच्या दर्शनाने घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:16 PM