हे पाहा भाव (प्रतिकिलो)
तणावापूर्वीचे भाव सध्याचे भाव
पिस्ता - १००० १२००
जर्दाळू - १२०० १४००
काळे मणुके - ४०० ५००
अंजीर - १००० १२००
बदाम - ६८० ११००
खारीक - १५० २००
चौकट-
येणाऱ्या मालाविषयी शाशंकता
शहरातील व्यापाऱ्यांकडे सध्या सुकामेव्याचा साठा असला तरी दिवसागणिक बदलणाऱ्या परिस्थितीमुळे भविष्यात माल येईल की नाही याबाबत व्यापारी शाशंक असल्यामुळे माल नेमका कधी विकायचा याचा अंदाज घेतला जात आहे. आज ११० रुपयांनी विकला जाणारा माल जर उद्या १३० आणि १४० रुपयांनी विकला जाणार असेल तर कोणताही व्यापारी सध्या घाई करताना दिसत नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊनच व्यापार केला जात आहे.
चौकट-
दर पूर्ववत होणे कठीण
अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुकामेव्याचे दर वाढले आहेत. परिस्थिती निवळेपर्यंत तरी दर कमी होण्याची कोणतीही चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत. आहे तो माल व्यापारी पुरवून विकत आहेत. यामुळे आताच भविष्यातील दरांबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. - विजय भिंगे, ड्रायफ्रूट विकेते, नाशिक
कोट-
कोणत्याही व्यापाऱ्याकडे साठा असतो तो पंधरा-वीस दिवसांचा. वर्षभर माल पुरवू शकेल अशी कुणाचीही स्थिती नसते. यामुळे आता जे दर वाढले आहेत ते कमी होणे कठीणच. उलट त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सणासुदीचे दिवस आहेत, त्यात दिवाळी येणार आहे. यामुळे सुकामेव्याला मागणी चांगली आहे.
- अनिल बूब, व्यापारी