सायखेडा : निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मार्च महिन्यात विहिरींनी तळ गाठला आहे. तेव्हापासून नागरिक पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे, त्यामुळे या भागात वरदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहेभेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, सोनगाव, रामनगर या गावांच्या शिवारातून कडवा कॅनॉल जातो. फेब्रुवारी महिन्यात शेवटचे आवर्तन सोडण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप पाण्याचा एक थेंब आला नाही. मृग नक्षत्र सुरू होताच पावसाने अनेक भागात हजेरी लावली होती; मात्र या गावात तुरळक पाऊस झाला. पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपत आले असून, दिलासा देणारा पाऊस पडत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या भागाला वरदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला पिण्याच्या पाण्यासाठी किमान एक महिन्याचे आवर्तन सोडावे.काही दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात काही अंशी समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे धरण किमान ५० टक्के भरले आहे. धरणातील पाणी गोदावरी नदीच्या पात्रात दारणा नदीच्या माध्यमातून सोडण्यात येत असते. ते यंदा न सोडता धरण लाभक्षेत्रातील कॅनॉल ज्या गावांमधून गेला आहे, त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एक आवर्तन सोडावे आणि नागरिक, जनावरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. पावसाळा किमान दोन ते अडीच महिने बाकी असल्याने धरण क्षेत्रात परत एकदा चांगला पाऊस होऊन पुन्हा धरण भरेल. आता मात्र या गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा शेतकरी, नागरिक यांना लागली असल्याने आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.फळबागांचा प्रश्न मार्गी लागणारकडवा धरणात ५० टक्के जलसाठा साचला आहे, अजून पावसाळा अडीच ते तीन महिने शिल्लक आहे, त्यामुळे एक आवर्तन सोडून दिले तरी पुन्हा धरण भरणार असल्याने नागरिकांना तुर्तास दिलासा मिळेल. माणसे, जनावरे, फळबागा यांचा प्रश्न तूर्त मार्गी लागेल अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. त्यामुळे एक महिन्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी केली जात आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 6:20 PM
निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
ठळक मुद्देगोदाकाठ : कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी