नांदूरवैद्य : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना गोंदे फाटा परिसरात मंगळवारी (दि.२) पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओवरील (क्र . एमएच ४१ सी ७२५०) चालकाचे गोंदे फाटा परिसरात असलेल्या गतिरोधकावर नियंत्रण सुटल्याने गाडी गतिरोधकावर आदळून पुढे चालणाºया अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत स्कॉर्पिओतील संजय अनिल खंडारे (५), अनिल तुळशीराम खंडारे (३८), अनिल शालिग्राम तायडे (२६), अंजना शालिग्राम तायडे (५०), शालिग्रम तुकाराम तायडे (६०), अजिम मोहम्मद अन्सारी (२७, सर्व रा. अमरावती, अकोला) जखमी झाले. यापैकी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान अपघाताची माहिती गस्त घालत असलेल्या वाहतूक पोलिसांना कळताच त्यांनी सदर अपघाताची माहिती वाडीवºहे पोलिसांना कळवले. माहिती मिळताच वाडीवºहेचे पोलीस निरीक्षक विश्विजत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी फड, परदेशी, श्याम सोनवणे, जाधव घटनास्थळी दाखल झाले.जगत्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रु ग्णवाहिकेतून जखमींना घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला असून, वाडीवºहे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 9:00 PM