कोविड कालावधीत मुदत संपलेले लर्निंग लायसन्स फिटनेस प्रमाणपत्र पासिंग यासाठी केंद्र शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली होती. ३० सप्टेंबर नंतर ज्याची मुदत संपलेली आहे त्यांचे लायसन्स बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरी धावपळ वाढली आहे. अर्थात, आरटीओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुदताढ दिली जाईल की, संबंधितांना नव्याने लायसन्स काढावे लागतील याबाबत केंद्र शासन निर्णय घेणार त्यामुळे केंद्र शासनाने लायसन्स बाद होऊ नये यासाठी काही निर्णय घेतला तर त्याचा वाहनधारकांना फायदा होईल मात्र अद्याप शासनाकडून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नसल्याने मुदत संपलेले लर्निंग लायसन्स फिटनेस प्रमाणपत्र पासिंग यासाठी आठवड्याभराची मुदतवाढ आहे.
इन्फो...
तारीख मिळालेले येत नाही, त्यामुळे अकारण घोळ
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंग लायसन्स लर्निंग लायसन्स तसेच वाहनसंबंधी मॅन्युअल कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सात दिवसांच्या आत तारीख मिळते सहसा दोन दिवसांत तारीख देण्याचे काम केले जाते तारीख मिळाली असली तरी काहीजण येतात, मात्र काही गैरहजर राहतात वाहन संबंधित कामासाठी येणाऱ्यांना तारीख दिली जाते. मात्र, ज्यांना तारीख मिळते ते येत नसल्याने इतर गरजवंत मात्र मागे पडतात.
..इन्फो...
रोज ४०० लायसन्सचा कोटा
लायसन्स काढणे लर्निंग लायसन्स तसेच पासिंग यासह विविध कामांसाठी रोजचा कोटा ठरविला आहे त्यात पासिंगसाठी १६०, लायसन्ससाठी ४००, तर लर्निंग लायसन्स काढण्यासाठी १५० व अन्य इतर मॅन्युअल कामासाठी कोटा ठरविलेला आहे.
इन्फो..
काय आहेत अडचणी?
१ लर्निंग लायसन्स कामासाठी दैनंदिन ठरलेल्या कोट्यानुसार ९० टक्के वाहनधारक हजेरी लावतात, तर दहा टक्के तारीख घेऊनही गैरहजर राहतात.
२ नंबर लागूनही अनेक जण येत नाही त्यामुळे गरजवंत असलेल्या नागरिकांना मात्र थांबावे लागते आणि त्यांचा वेळ वाया जातो.
३ नवीन तारखा आरटीओकडून सात दिवसांत दिल्या जात असल्या तरी सध्या कोटा फुल होण्याची भीती असल्याने खरोखरीच पुन्हा संधी मिळेल किंवा नाही याबाबत साशंकता असते.
४ कोटा पद्धतीनेमुळे सध्या धावपळ सुरू असल्याने केंद्र शासनाने ३० सप्टेंबर ऐवजी आणखी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.
इन्फो...
लायसन्स नव्याने काढावे लागणार की काय?
कोट..
आरटीओमध्ये लायसन्स नूतनीकरणासाठी कोटा असून, त्यामुळे नंबर लागावा यासाठी प्रयत्न करावे लागतात. अन्यथा शासनाने मुदतवाढ न दिल्यास अकारण नव्याने लायसन्स काढावे की याची भीती वाटते.
- प्रकाश पवार, वाहनचालक
आरटीओने दिलेल्या वेळेत जायला जमले नाही तर आरटीओकडून पुन्हा तारीख दिली जाणार आहे. मात्र, तरीही आता सप्टेंबर महिना संपण्यास अवघे दहा दिवस शिल्लक असल्याने कोटा फुल होण्याची भीती वाटते.
- प्रगती देशपांडे, गंगापूररोड
कोट...
लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग संदर्भात अद्यापपर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या मुदत वाढ बाबतीत आदेश आले नाही किंवा निर्णय झाला नाही. आत्तापर्यंत मुदत वाढ मिळाली होती त्यामुळे वाहन संबंधित कामे करण्यासाठी आलेल्या सर्वच वाहनधारकांना कामे पूर्ण करण्यासाठी तारीख मिळाली आहे.
- प्रदीप शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी