(जागतिक टपाल दिन)नाशिक: लॉकडाऊनच्या काळात बॅँकीग तसेच वाहतुक व्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला असतांनाही कोरोनाच्या या संकटात जिल्'ात टपाल खात्याच्या अर्थवाहिनीने सर्वसामान्यांना आधार दिला. या काळात टपाल खात्याने कोट्यवधी रूपये ग्राहकांना घरपोच दिलेच शिवाय आठ हजारापेक्षा अधिक बॅँक खातीही याकाळात उघडली गेली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना टपाल खात्याचे कामकाज मात्र सुरू होते. एप्रिल मे या प्रभावाच्या काळात ५० टक्के तर जून पासून पुर्ण क्षमतेने टपाल खात्याचे कामकाज सुरू झाले. गेल्या एप्रिल ते सप्टेबर या कालावधीत सुमारे ७५ हजार इतके स्पीड पोस्ट, रजिस्टर आणि पार्सल घरोघरी पोहचविण्यात आले . याशिवाय कोरोनामध्ये औषधांची गरज असलेल्यांनी टपाल खात्याच्या पार्सल सेवेचा आधार घेत पर जिल्'ातून औषध मागविली. सुमारे ४२ हजार डिपॉझिटचे तर खात्यातू पैसे काढण्याचे सुमारे ६४ हजार इतके व्यवहार झाले.मालेगाव वगळता असलेल्या विभागात २० पोस्टमनच्या माध्यमातून दररोज टपाल बटवडा सुरूच होता. दररोज तीन ते साडेतीन हजार इतक्या टपाल, पाकीटे, पार्सलचा बटवडा करण्यात आला.अन्य बॅँकांचे व्यवहार पोस्टातूनकोणत्याही बॅँक खात्यातील आपले पैसे टपाल खात्याच माध्यमातून काढण्याची सुविधा असलेल्या आधारलिंक योजनेतून जिल्'ात सुमारे दिड लाख ग्राहकांनी सुमारे २० कोटींचे व्यवहार टपालाच्या माध्यमातून केले. लॉकडाऊनच्या काळात बॅँकींग व्यवस्था नसलेल्या आदिवासी, ग्रामीण भाग तसेच खेड्यापाड्यात या योजनेचा ग्राहकांनी लाभ घेतला.संपुर्ण लॉकडाऊनच्या काळात टपाल खात्याचंी यंत्रणा सुरळीत सुरू होती. बॅँकीग व्यवहाराला या काळात चांगली चालना मिळाली. बचत खाती देखील उघडली गेली. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत, टपाल, पार्सल पोहचविण्याचे काम टपाल खात्याने केले.- एस.आर. जाधव,वरिष्ठ अधिक्षक, नाशिक डाक