शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

देवळा पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाइ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 3:58 PM

देवळा : १४ एप्रिल नंतर संचारबंदीत थोडी शिथिलता दिल्यानंतर परीस्थिती आता सामान्य झाली, असा ग्रह करून देवळा शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढू लागली होती. त्यात मालेगाव शहरात कोरोना रूग्णांची संख्या चिंता वाटावी अशा वेगाने वाढू लागल्यानंतर देवळा पोलिस सतर्क झाले. संचारबंदी व लॉक डाऊनचा नियमभंग करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमालेगावात कोरोना रु ग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पोलिस सतर्क

देवळा : १४ एप्रिल नंतर संचारबंदीत थोडी शिथिलता दिल्यानंतर परीस्थिती आता सामान्य झाली, असा ग्रह करून देवळा शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढू लागली होती. त्यात मालेगाव शहरात कोरोना रूग्णांची संख्या चिंता वाटावी अशा वेगाने वाढू लागल्यानंतर देवळा पोलिस सतर्क झाले. संचारबंदी व लॉक डाऊनचा नियमभंग करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दि. २४ मार्चपासून लॉक डाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. नागरीकांना घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करण्यात येत होते. परंतु याकडे काही नागरिक दुर्लक्ष करीत होते. संचारबंदीच्या या काळात अत्यावश्यक सेवा देणाºया व्यतिरिक्त अन्य नागरिकांनी रस्त्यावर वाहने घेऊन कोणी फिरू नये या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांना पोलिसांनी काठीचाही प्रसाद दिला. परंतु नागरिकांवर याचाही परिणाम झाला नाही.नियमांचे उल्लंघन करीत क्षुल्लक कारणे देत नागरिक रस्त्यांवर वावरत होते. विविध कामांच्या बहाण्याने दुचाकी सर्रास रस्त्यावर दिसत होत्या. त्यांंना आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शशनाखाली गुरूवार (दि. १६) पासून शहरातील पाचकंदील चौकात विनाकारण रस्त्यावर फिरणाºया व कागदपत्रांची अपूर्तता असलेल्या वाहनचालकांवर वाहन जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.वाहनावरून फिरणाºया नागरीकांच्या कामांची पडताळणी करण्यात येत आहे. यामुळे विनाकारण फिरणाºया वाहनांना चांगलाच आळा बसला. १४ एप्रिल नंतर वाहनांची गर्दी रस्त्यावर वाढू लागली, यामुळे पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली असून नागरीकांंनी कारवाईचे स्वागत केले आहे.सदर कारवाईत रविंद्र मल्ले, अंकुश हेंबाडे, संदीप चौधरी, सुरेश कोरडे आदी पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांचे कोरोना व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन व संचारबंदी लागू असून नागरीकांनी सोशल डिस्टंशींगचे पालन करून गर्दी करणे टाळावे व घराबाहेर पडू नये. शासनाने दिलेल्या सुचनांचे नागरीकांनी पालन करावे.- सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक देवळा. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या