नाशिक : शहरासह जिल्ह्यातदेखील विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार शिगेला पोहोचला असून, विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभाही तालुकास्तरावर होऊ घातल्या आहेत. संवेदनशील मालेगावमध्ये मतदानाच्या दिवशी ग्रामीण पोलीस थेट ५ ड्रोनद्वारे हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.ग्रामीण भागातील गावपातळीपर्यंत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, सटाणा, सिन्नर, देवळा, सुरगाणा आदी तालुक्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. या तालुक्यांमध्ये विविध राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांमधील राजकीय द्वंद्व लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासाठी अपर अधीक्षक, उपअधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या सर्व अधिकाऱ्यांची सिंह यांनी संयुक्तरीत्या बैठक घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाºया सभा, प्रचारफेऱ्यांपासून तर मतदानाच्या दिवसापर्यंत चोख सुरक्षाव्यवस्था जिल्ह्यात कशाप्रकारे ठेवायची याविषयीच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.या अंतर्गत निफाड तालुक्यात दोन आणि मालेगाव तालुक्यात तीन अशा एकूण पाच ड्रोनच्या कॅमेºयांद्वारे पोलीस तेथील मतदानप्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. कुठल्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तत्काळ नियंत्रण कक्षातून संबंधित ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या अधिकाºयांना त्याबाबत सूचित करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले जाणार आहे. कायदासुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाºयांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नसल्याचे सिंह यांनी सांगितले.गल्लीबोळातील हालचाली टिपणारमालेगावमध्ये अतिशय दाट लोकवस्ती असल्यामुळे गल्लीबोळातील हालचालींवर लक्ष ठेवणे अवघड होते. त्यामुळे पोलिसांनी मालेगावच्या आकाशात किमान तीन ड्रोन फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील प्रत्येक गल्लीबोळातील हालचाली ड्रोनद्वारे टिपल्या जाणार आहेत, जेणेकरून कुठेही कोणत्याही प्रकारे कायदासुव्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न होणार नाही, यासाठी ही खबरदारी ग्रामीण पोलीस घेत आहेत.
संवेदनशील मालेगाववर ‘ड्रोन’ची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 2:03 AM
शहरासह जिल्ह्यातदेखील विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार शिगेला पोहोचला असून, विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभाही तालुकास्तरावर होऊ घातल्या आहेत. संवेदनशील मालेगावमध्ये मतदानाच्या दिवशी ग्रामीण पोलीस थेट ५ ड्रोनद्वारे हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.
ठळक मुद्देग्रामीण पोलिसांकडून दक्षता : निफाडच्या आकाशातही भिरभिरणार ड्रोन