शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

टंचाईबरोबरच नियोजनाचा दुष्काळ

By admin | Published: May 14, 2016 10:55 PM

कळवण : एकही टँकर सुरू नसलेला एकमेव तालुका

 मनोज देवरे  कळवणशासनाच्या कागदावर कळवण तालुका सुजलाम्, सुफलाम् आणि पाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे, परंतु वास्तव वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत यासाठी प्रयत्न केले. त्याच आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. शासकीय यंत्रणेचे उंबरठे झजविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन - चार किलोमीटरच्या परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे; मात्र गावाच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण हा तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे; पुनंद आणि ओतूर खोऱ्यातील डोंगर-कपारीतील आदिवासी वस्ती-पाडे या गाव-वस्तींना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत; परंतु विहीर तसेच विंधन विहिरींना पाणी नाही. कारण या भागातील नैसर्गिक जलस्रोत नदी-नाले, बंधारे, तलाव, पाणी अडवून जिरवण्याचे छोटे बंधारे, विहिरी कोरडेठाक पडले आहेत, ही तालुक्याची आजची वस्तुस्थिती आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने त्याचा परिणाम शेती क्षेत्राला आणि त्यावर अवलंबून असलेल्या मनुष्यबळ, शेतीपूरक व्यवसायांना भोगावे लागत आहे. हाताला काम नसलेले हजारो शेतमजूर बेकार झालेले आहेत. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत पिण्यासाठी ग्लासभर तरी पाणी मिळवावे तर त्यासाठी वणवण करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. टंचाईच्या मोठ्या झळा कळवण तालुक्यामध्येही बसत आहेत. पाण्याची झळ बसणारे नागरिक टँकरची मागणी करत आहेत, तर शासन विहीर अधिग्रहणावर भर देत आहे. जवळील शेतात पाणी सुरू झाले की, घरात असेल-नसेल तेवढी रिकामी भांडी भरून घेण्यासाठी सर्वांची धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. पाणी आपल्याला मुबलक मिळाले पाहिजे, अशी मानसिकता झाली आहे. पण विखुरलेल्या लोकवस्त्यांवर आळी-पाळीने दररोज पाणी पुरवताना ग्रामपंचायतींनादेखील कसरत करावी लागत असून, या परिस्थितीला तोंड देताना यंत्रणेच्या नाकीनव आले आहेत. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेद्वारे दर दिवशी अर्धातास पाणी दिले जाते. काही भागात मिळते तर काही भागात तेही मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना आपल्यावर पाणी पुरवताना अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागत आहे. तर अनेकदा नळाच्या पाण्यावरून नागरिकांमध्ये भांडणे होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गावातील पाण्याचे स्रोत दुरूस्ती कामात घोळ झाल्याने पावसाळ्यात यात जमा होणारे पाणी हिवाळ्याच्या मध्यात झिरपून वाया जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विहिरी, आड यांच्या भूजल पातळीत भर पडली नाही. परिणामी भोवताली पाणी असूनही पिण्यास पाणी नाही, अशी एकंदरीत तालुक्याची स्थिती झाली आहे.