मालेगाव : तालुक्यातील १५० गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्याने या गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. दुष्काळ निवारणासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना जाहीर झाल्या असून, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.राज्यात २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये या योजनांचा लाभ होईल. त्यात जमीन महसुलात सूट, कृषिपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट मिळणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅँकरचा वापर, दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांंच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदि योजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)
तालुक्यातील लाभार्थी १५० गावे पुढीलप्रमाणे-मालेगाव, मालेगाव कॅम्प, सोयगाव, भायगाव, संगमेश्वर, मालधे, चंदनपुरी, दाभाडी, पिंपळगाव, जळगाव गाळणे, आघार बुद्रुक, ढवळेश्वर, बेलगाव, तळवाडे, पांढरुण, रावळगाव, दुंधे, अजंग, काष्टी, निळगव्हाण, मुंगसे, कौळाणे निंबायत, नगाव दिगर, वऱ्हाणे, सोनज, टाकळी, मांजरे, शिरसोंडी, तिसगाव, सावकारवाडी, झाडी, एरंडगाव, जळगाव निंबायत, चोंढी, घोडेगाव, घोडेगाव चौकी, काळेवाडी, मेहुणे, ज्वार्डी बुद्रुक, भुईगव्हाण, माथुरपाडे, गिलाणे, मळगाव, खायदे, डबगुले, निमगुले, खुर्द, निमगुले बुद्रुक, साकुरी निंबायत, जेऊर, माथर्डे, कळवाडी, दापूर, शेरूळ, हिसवळ, पाडळदे, रोझे, सायतरपाडा, चिंंचगव्हाण, नरडाणे, उंबरदे, दहिवेल, बोढे, गिगाव, माल्हणगाव, रोंझाणे, सिताणे, खलाणे, देवघट, साकुरी, झोडगे, गुगूळवाड, भिलकोट, साजवहाळ, पळासदरे, अस्ताणे, टोकडे, कंधाणे, मोहपाडा, माणके, जळकू, करंजगव्हाण, कंक्राळे, कुकाणे, वनपट, टिंगरी, दहिदी, दसाणे, लोणवाडे, हाताणे, खडकी, वडगाव, द्याने, घाणेगाव, कौळाणे, गाळणे, डोंगराळे, भारदेनगर, वजीरखेडे, डाबली, लेंडाणे, वडेल, वडनेर, सावतावाडी, खाकुर्डी, टिपे, मोरदर, वळवाडे, वळवाडी, निमशेवडी, पोहाणे, कजवाडे, रामपुरा, गारेगाव, विराणे, गरबड, चिंवेगाळणे, गाळणे, लुल्ले दिगर, जाटपाडे, चौकटपाडे, येसगाव बुद्रुक, येसगाव खुर्द, ज्वार्डी खुर्द, निमगाव खुर्द, अजंदे, अजंदे खुर्द, नाळे, शेंदुर्णी, देवारपाडे, सायने बु।।, दरेगाव, सवंदगाव, सायने खुर्द, दहिकुटे, कोठरे बुद्रुक, सौंदाणे, पाटणे, वाके, नांदगाव बुद्रुक, नांदगाव खुर्द, आघार बुद्रुक, ंिंचंचवड या गावांचा समावेश आहे.