नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षांचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शहर पोलीस आयुक्तालयातील २६ ठिकाणी नाकाबंदी, तर ३९ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले होते़ पोलिसांनी रविवारी (दि़३०) व सोमवारी (दि़३१) या दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दीडशेहून अधिक वाहनचालकांवर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली़ याबरोबरच शेकडो बेशिस्त वाहनचालक व टवाळखोरांवर कारवाई केली़
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. कालावधीत पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता़ त्यामध्ये नाकाबंदी, फिक्स पाँइट, पेट्रोलिंगसह साध्या वेशातील पोलीस बंदोबस्ताचा समावेश होता़ ३१ डिसेंबर हा सोमवारी आल्याने बहुतांशी नागरिकांनी रविवारी (दि.३०) पार्टीचे आयोजन केले होते़ त्यामुळे पोलिसांनी रविवार व सोमवार अशी दोन दिवस कारवाई केली़ सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची ही वाहनतपासणी मोहीम सुरू होती़ त्यामध्ये १५२ मद्यपी आढळून आल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाºया २०० बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली़
झोपडपट्टी परिसरात कोम्बिंगझोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या गुन्हेगारांवर वचक रहावा यासाठी पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले़ यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच वाहनांची तपासणी करण्यात आली़ पोलिसांनी टवाळखोर तसेच अश्लील हावभाव करणाºया सुमारे ३५० संशयितांविरोधात कारवाई केली आहे़असा होता शहरातील बंदोबस्तपोलीस आयुक्तालयातील चार पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह कर्मचारी रस्त्यावर उतरले होते़ विशेष म्हणजे प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी तीन नाकाबंदी पॉर्इंट लावण्यात आले होते़ पोलीस अधिकाºयांसह सुमारे दोन हजार पोलीस कर्मचाºयांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता़ब्रेथ अॅनालायझरच्या साहाय्याने तपासणीशहर वाहतूक शाखेतर्फे महामार्ग, औरंगाबादरोड, पुणेरोड, त्र्यंबकरोड, गंगापूररोड, कॉलेजरोड, पेठरोड, दिंडोरीरोड, शहरातील प्रमुख चौक व प्रमुख रस्त्यांवर ४२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती़ याठिकाणी वाहनचालकांची १५ ब्रेथ अॅनालायझर मशीनच्या साहाय्याने तपासणी केली जात होती़ तसेच हुज्जत घालणाºया नागरिकांचे १३० बॉर्डी वॉर्न कॅमेराद्वारे छायाचित्रणही केले जात होते़ यावेळी मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांवर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली़